उमरी ; नागोराव कुडके
उमरी येथे लोक स्वराज्य आंदोलन संघटनेची मोठी व्यापक सौरूपाची बैठक संपन्न झाली आहे.तर या बैठकीला लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे ,लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष रावसाहेबदादा पवार तर या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचेंद्रजी भरांडे यांनी मार्गदर्शन केले तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून देशाशातच नव्हे तर जगात कोरोणा सारख्या महामारीने थैयमान घातले आहे या महामारी सर्व सामान्य माणसाला सर्वात जास्त फटका बसला आहे कारण सामान्य माणसाचे पोट हे त्यांच्या हातावर आहे कारण त्यांना एक दिवस काम नाही केले तर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्र्न निर्माण व्हायचा म्हणुन या लाॅकडाऊंनच्या काळा मध्ये सामान्य माणसांचे बेहाल झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आपण मिटींग असेल किंवा कोणते ही.
कार्यक्रम असेल ते आपल्या ला घेता आला नाही.कारण या महाभयंकर बिमारीमुळे लॉकडाऊन पडल्या कारणाने कोणत्याही विषयावर भेटु शकलो नाही. यापुढे आपण पुर्वी प्रमाने जोमात कामाला लागवे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुन आपण सर्व शेवटच्या घटका पर्यंत जाऊन आपली भूमिका स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
असा संदेश प्रा.रामचंद्र भरांडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे या बैठकीला उपस्थित रावसाहेबदादा पवार नागोराव कुडके तर उमरी तालुक्यातील बालाजी बंगारीकर , साहेबराव गव्हाळक , जि.टी.झुंजारे ,कैलास सुर्यवंशी , प्रकाश टिकेकर ,राजु झुंजारे , गंगाधर गायकवाड , श्रावण गायकवाड , श्रीनिवास झुंजारे .दत्ता गोणारे , दत्तराम सुर्यवंशी , पांडुरंग गजलेकर , साहेबराव दुबळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.