नांदेड
मा.शिक्षणाधिकारी(प्रा.) व मा.प्राचार्य डायट यांनी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या दि.२५ अॉगस्ट २०२०च्या झूम आढावा बैठकीत ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेबाबतकेलेल्या महत्वपूर्ण सूचना-*
1. ऑनलाईन शिक्षणात दीक्षा ऍपचा प्रभावीपणे वापर करावा.
2.कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया चालू ठेवण्याबाबत शासन निर्णय दि.28 एप्रिल,15 जून व वेळोवेळी आलेल्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी.
3.पाठ्यपुस्तकात दिलेल्या QR कोडचा वापर करून पाठ्य विषयाचे अधिक संदर्भ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे.
4.ऑनलाईन पद्ध्तीने शिक्षण देता यावे यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वतः ते परिणामकारक हाताळता यावे यासाठीचे soft skills शिकावे.
5.दीक्षा ऍपवर Creative and Critical Thinking (CCT) बाबत दर सोमवारी अपलोड होणारे व 8 ते 10 वर्गासाठी परिणामकारक साहित्याचा वापर करावा.
6.इ-बालभारतीवर अपलोड केलेली पुस्तके, किशोर मासिक यांचा सखोल वाचनासाठी उपयोग करावा.
7.राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या शैक्षणिक कॅलेंडर व अभ्यासक्रमानुसार योग्य साहित्य शेअर करावे.
8.गृहाभेटीतुन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत प्रगती पाहून त्यांना मार्गदर्शन करावे.
9.प्रत्येक गावात उपलब्ध असलेल्या शिक्षित व्यक्तींचा शिक्षक मित्र म्हणून शिक्षण प्रक्रियेत उपयोग करून घ्यावा.
10.नियमित राज्यस्तरावरून येणारी अभ्यासमाला विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी प्रेरित करावे.
11.विद्यार्थ्यांच्या गटांना zoom app च्या माध्यमातून अध्यापन करावे.
12.केवळ pdf, video, test दिले म्हणजे अभ्यास झाला असे नाही तर अभ्यासक्रमानुसार क्रमवार घटकावरच भर करून विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
13.दर आठवड्यात केंद्र,बिट स्तरावर zoom मिटिंगच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रियेचा आढावा घेऊन अडचणी सोडवाव्यात.
14.सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू ठेवावी.
*याशिवाय अनेक बाबींचा आढावा घेण्यात आला असून पुढील काळात शाळाभेटीत या बाबींचा आढावा घेतला जाईल असे मत व्यक्त करून सर्व शिक्षकांनी देण्यात येणाऱ्या सूचनासोबतच स्वयंप्रेरणेने अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान करावी. अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.