कंधार
भारत मातेच्या रक्षणार्थ भारतीय वीर जवान सीमेवर आपल्या परिवारा पासून कोसो दुर राहून दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून प्राणाची बाजी लावत रक्षण करीत असतात.हे वीर सैनिकांचे कार्य प्रेरणादायी अन् देशभक्तीने ओतप्रोत असते.
या बहाद्दर सैनिकांना आपल्या कुटूंबा पासून दुर राहिल्याने रक्षाबंधन सणानिमित त्यांच्या भगीनींची राखी प्रत्यक्ष बांधून घेता येत नसल्यामुळेच मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून भारतीय शूर जवानांना ३३३३ राख्या व ३३३३ सदिच्छा पत्र सोबत १५ फुट लांबीची महाराखी २०१५ या वर्षा पासून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे हरहुन्नरी कलावंत, सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर हे दिव्यांग असून राष्ट्रीय स्तराचा उपक्रम दरवर्षीच करतात.
यंदाचे हे आठवे वर्ष आहे.या वर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या कंधार आगारात मान्यवरांच्या उपस्थितीत सदिच्छा पत्रांचा विमोचन सोहळा पार पडला.


या राष्ट्रप्रेमी उपक्रमाच्या उद्घाटन समारंभास किशोर भोसले, बालाजी जाधव, धोंडीबा आव्हाड यांच्या हस्ते दत्तात्रय एमेकर यांच्या भारतीय सैनिकांना शुभेच्छा संदेश पञकाचे विमोचन कंधार आगारात करण्यात आले .


यावेळी भारतीय सैनिक शिवहार कागणे , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुका अध्यक्ष मिर्झा जमीर बेग, शिक्षक नेते राजहंस शहापूरे , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे ,

विमा प्रतिनिधी अण्णा डांगे , सौ गीता शंकर आंबेकर ताई यांच्यासह कंधार आगारातील कर्मचारी , वाहक चालक उपस्थित होते .




