मन्याड फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची एकनाथ पवार यांनी केली निवड.

कंधार तालुकाध्यक्षपदी शिवसाब देशमुख तर लोहा युवक तालुकाध्यक्षपदी गजानन पा.मोरे यांची निवड

कंधार प्रतिनीधी

 सूर्योदय मन्याड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजप गटनेते एकनाथ पवार हे लोहा -कंधार मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याने  गेल्या अडीच वर्षापासून ते जोरदार तयारी करत आहेत. प्रत्येक गावोगावी भेटीत देऊन जनसंपर्क करुन कार्यकर्त्याची फळी निर्माण करत आहेत.  काही महिन्यावरच जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका येऊन ठेपले असल्याने त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून प्रत्येक गावात कार्यकर्ता निर्माण करण्याचे सध्या जोमाने चालू आहे. लोहा व कंधार तालुक्यात संघटक बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून सूर्योदय मन्याड फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये कंधार तालुका अध्यक्ष म्हणून शिवशांब देशमुख यांची निवड करण्यात आली तर लोहा युवक अध्यक्षपदी गजानन पाटील मोरे यांची निवड करण्यात आली आहे

   लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीकोणातुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजप गटनेते एकनाथ पवार हे गेल्या तिन वर्षापासुन मतदार संघात काम करत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता संघटनात्माक बांधणी करण्यासाठी मन्याड फाऊंडेशन च्या माध्यमातून कार्यकारणी तयार केले जात आहे.गाव तेथे शाखा व घर तिथे कार्यकृर्ता हे निर्माण करण्यासाठी एकनाथ पवार यांनी कंबर खचली आहे.तालुका स्तरावर  पदधिकाऱ्यांची निवड केल्या जात आहे. एकनाथ पवार यांच्या उपस्थित दिनांक 6जुलै रोजी दुपारी 2वाजता लोहा येथाल शासकीय विश्रामगृह लोहा येथे  कार्यकृत्यांची बैठक घेण्यात  आली. या बैठकीला  

जिल्हाध्यक्ष बालाजी परदेशी,तालुकाध्यक्ष ब्रह्मानंद सिरसाट,गजानन जोशी,धर्मविर शेतकरी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब पा.जाधव व संगणक परिचालक संघटना जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती.या बैठकीत पदधिकारी यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये गजानन पा.मोरे युवक तालुकाध्यक्ष लोहा,कपिल पा.गवते तालुका सरचिटणीस लोहा,भिमराव पा.शिंदे तालुका संघटक लोहा शिवशांब देशमुख तालुकाध्यक्ष कंधार ,तर नवनाथ पा.हालगे यांची पेनुर सर्कल पदी निवड करण्यात आली आहे.

     यावेळी सूर्योदय मन्याड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, या मतदारसंघाची दयनीय अवस्था झाली आहे. लोहा- कंधार मतदार संघ हा माझा जन्मभूमी असल्याने  या जन्मभूमीसाठी काय तरी केले पाहिजे,या उद्देशाने मी गेल्या तीन वर्षापासून लोहा -कंधार मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावात जाऊन संपर्क साधत आहे .नागरिकांचा व जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोहा-कंधार मतदार संघातुन विधानसभा निवडणूक लढवणार आहे. राज्यात शिंदे फडवणीचे सरकार आल्याने त्यांच्या माध्यमातून लोहा कंधार मतदार संघामध्ये विकास कामे करण्याचा माझा प्रमाणिक प्रयत्न राहणार आहे . त्यामुळे तुम्ही मला साथ द्या मी या मतदारसंघात परिवर्तन करून दाखवतो असे आश्वासन एकनाथ पवार यांनी या बैठकीतून कार्यकर्त्यांना दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *