पेठवडज मध्यम प्रकल्प तुडुंब भरला… तेरा गावाचा व 1400 हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटला प्रकल्प खालील गावांना 4 गावाना सतर्कतेचा इशारा

कंधार ; प्रतिनिधी

पेठवडज मध्यम प्रकल्प 100 टक्के जुलै महिन्यातच भरला असून यामुळे परिसरातील गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले परंतु सततच्या या मागील चार दिवसापासून च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

1972 मध्ये भारताचे तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते पेठवडज मध्यम प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते 14 दलघमी जलसाठ्याचा असणारा हा प्रकल्प असून जुलै महिन्यातच हा प्रकल्प 100 टक्के तुडुंब भरला आहे त्यामुळे प्रकल्पाखालील गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती प्रकल्पाचे लिपिक व्ही व्ही जायनोरे यांनी दिली आहे .

प्रकल्प तुंडुब भरल्यामुळे प्रकल्प खालील तेरा गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून यासोबतच या प्रकल्पावरील 1400 हेक्टर आता जमीन सिंचनाखाली येणार असून प्रकल्पाखालील चार गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

या प्रकल्पावरील चौदाशे हेक्टर वर सिंचन होत असून तेरा गावासाठी हा प्रकल्प कामधेनू आहे त्यात पेठवडज गोणार येलूर मसलगा नारनाळी मादळी खंडगाव बोमनाळी बेळी ही गावी असून हा प्रकल्प 2016 ते 17 पासून ते आज पर्यंत लगातार चार वर्षे प्रकल्प तूंडुब भरत आहे त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सिंचनाचाही प्रश्न सुटत आहे शेतकऱ्याच्या आर्थिक बळकटीला चालना मिळणारा हा प्रकल्प असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी प्रकाश उलगूलवाड यांनी दिले .

तसेच मागील आठ ते दहा दिवसापासून सततच्या पावसामुळे व चार दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस यासह कडधान्य पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना ओला दुष्काळा जाहीर करून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *