रोजच्याप्रमाणे दोघेही दिवसभर आपल्याला कामात व्यस्त होते..कितीही काहीही झालं तरी संध्याकाळी एक कॉफी एका कपात दोघांनी प्यायची असा प्रेमाचा नियम..
सुंदर पावसाळी हवा, एखादी रजाई ओढून झोपुन मुव्ही पहावी किवा गाडी काढुन भुट्टा खात हातात हात घेउन लोणावळा, खंडाळा , धबधबे पहात फक्त उनाडक्या कराव्यात अशी हवा..
का कोण जाणे आज त्यांचा मुडच वेगळा होता.. तसा त्याने तिला फोन केला.. आज आपण एकत्र मुव्ही पाहु..एका कपात कॉफी पीऊ पण तु तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी… एका कपात कॉफी पीऊ ती पण तु तुझ्या घरी आणि मी माझ्या हे कसं शक्य आहे..
ती गोंधळून गेली.. याला आज काय झालय.. भेटायचं नाही म्हणुन कारणं देतोय का ?? .. कसं सांगु तुला मोज ना किती तास झाले भेटुन.. ती थोडी नाराज झाली पण यातही किती रोमॅंस आहे ना असं म्हणत त्याच्या आठवणीत गेली.. त्याची कालची मिठी तिला रजइ अंगावर असल्याचा भास देउन गेली..
ती त्याला म्हणाली कुठली मुव्ही पाहुयात ?? .. तो म्हणाला इजाजत पाहु..रेखा दोघांनाही आवडते…पण इजाजत मधील स्टेशनवरचा सीन आठवला की अंगावर काटा उभा रहातो. त्याला काहीतरी तिला सांगायचय त्यासाठी चाललेली तगमग त्याने तिच्याशी केलेली प्रतारणा असेल …
ती गोंधळून गेली.. याला ही मुव्ही का पहायची असेल.. आता कुठे आपलं प्रेम फुलतय , बहरतय .. नको नको अजिबात नको असं ती म्हणणार इतक्यात तो म्हणाला पुढच्या पाच मिनीटात मुव्ही सुरु करु आणि इंटरव्हल ला मी तुला फोन करतो मग आपण एकत्र एका कपात कॉफी पिउ.. त्याला म्हटलं का चेष्टा करतोयस आज ?? आणि तीही जीवघेणी.. तो म्हणाला तु एक घोट पी आणि फक्त कपाचा कान उजव्या हातातुन डाव्या हातात घे म्हणजे कॅफी मला मिळेल..How Romantic na.. किती सुंदर आहे हे सगळं.त्याच्या मिठीत राहुन कॉफी प्यायल्याचा आनंद मिळत होता.. पुन्हा दोघेही नव्याने मुव्हीत रमले आणि एकमेकांशिवाय पण एकमेकांच्या सोबतीने
……….. सोनल गोडबोले..