आज रोजी महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार येथे श्रेया परीक्षेचे फॉर्म आणण्यासंदर्भात भेट देण्यात आली त्या दरम्यान आदरणीय दिगांबर वाघमारे सर (मुख्याध्यापक )महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार यांच्या इयत्ता ४ थी वर्गाला भेट देण्याचा योग आला त्याच बरोबर त्यांनी चालु केलेल्या हस्ताक्षर उपक्रमाची पाहाणी केली असता वर्गातील प्रत्येक मुलांचे सुंदर हस्ताक्षर पाहुन खरच त्या वर्गातील मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याचबरोबर त्या मुलांना घडवणारे शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे व सर्व स्टाफ सौ कागणे यु.एम , आगलावे आनंद , केंद्रे राजू यांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे .

त्याच बरोबर इयता १ ली ,२री ,३री ,४थी तसेच विशेष त्या शाळेतील बालवाडीच्या वर्गातील बालकताई तेलंग मिस या घेत असलेल्या उपक्रमाची पाहाणी करण्यात आली अतिशय सुंदर तयारी करुन घेत गुणवत्ता बरोबर सुंदर हस्ताक्षर पाहुन मन प्रफुल्लित झाले व शाळेतील गुणवता पाहुन खुप आनंद झाला .
त्याच्या शाळेतील उपक्रम माझ्या शाळेत चालु करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक व सर्व स्टाफचे मनपूर्वक अभिनंदन व आभार

हनमंत जोगपेटे शिक्षक ,
जि. प प्रा शाळा वळसंगवाडी ता कंधार जिं नांदेड