कंधार ;
सध्या लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालंय. शिक्षणही.त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्य सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व शाळा बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये व त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी शाळा प्रशासनाने इंटरनेट व सोशल मीडियाचा अध्ययन सुरु ठेवला आहे.सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे.लॉकडाऊन काळातही कंधार शहरातील शासन मान्य कॉमटेक कंप्युटर सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून एमएस-सीआटी नवनवीन तंत्रज्ञानांचे धडे दिले जाणार आहेत.त्यामुळे पालकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील स्थानिक पातळीवरील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेऊन एमकेसीएल ज्ञानमंडळांनी शिक्षण चालू ठेवून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.त्यात सह्याद्री वाहिनीवर “टिलीमिली” या आनंददायी शिक्षण देणाऱ्या महामालिकेबाबत तालुक्यातील अनेक पालक व विद्यार्थीत आनंदाचे वातावरण मंडळाने निर्माण केले आहे. जिल्ह्याचे समनव्यक पंढरीनाथ आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४२ अधिकृत एमएस-सीआटी केंद्र यांच्या सहकार्याने विधार्थीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सर्व उपयुक्त सोयीत एमएस-सीआटी केंद्र सुरु होत आहेत.कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्यातील एमएस-सीआटी अधिकृत केंद्रात नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मोमीटर,ऑक्सीमिटर,फूट ऑपरेटर सॅनिटायझर स्टॅन्ड,शिक्षकास फेस फिल्ड,मास्क,हॅन्डग्लोज,विद्यार्थी बसण्यापूर्वी व उठण्यापूर्वी कीबोर्ड,माउस आदी साधनसामग्रीसह बसण्याची जागा सॅनिटाइज करून प्रत्येक बॅच मध्ये ५ मुलांना सेंटर मध्ये प्रवेश मिळणार आहे. या सर्व सुविधांनी युक्त तसेच कोरोना काळात घ्यावयाची काळजी,नियम व अटी पाळून विद्यार्थी,शिक्षक,गृहिणी,बेरोजगारांना उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण मिळणार आहे