मानवतावादी समाजसेविका:मदर तेरेसा
२६आॅगस्ट १९१०मध्ये युगोस्लाव्हिया मध्ये मदर तेरेसा यांचा जन्म झाला.त्यांना भारतरत्नं आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खरे पाहाता त्या आपल्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या होत्या.परंतु त्यांनी आपले अख्खे आयुष्य दुर्बल,अनाथांची सेवा करण्यातच व्यतीत केले.त्या अत्यंत मृदू स्वभावाच्या आणि प्रेमळ होत्या.भारतात त्यांनी सामाजिक कार्यात आपले भरीव योगदान दिले.#mother teresa
म्हणूनच भारतातील सर्वौच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.गरीब आणि दुर्बल लोकांना मदत करण्यात त्या सदैव तत्पर असतं.क्षमा हा मदर तेरेसा यांच्या संदेशाचा गाभा आहे,त्या नेहमी म्हणत “क्षमे शिवाय खरे प्रेम जगात असूच शकत नाही”.म्हणूनच की काय,आपल्या सेवाभावी कार्याने मदर तेरेसा या विश्वाची माता झाल्या.नि:स्पृह मनाने केलेल्या कार्याबद्दल त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या कार्याचा गौरव आहे,पण त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या पारितोषिकांपेक्षा लाख पटीने मोठे आहे.
जनसेवेचे व्रत अंगिकारल्यावर त्या वयाच्या ऐकीणासाव्या वर्षी भारतात आल्या,भारतातील प्रचंड गरीबी,दैनिय अवस्था पाहून त्यांचे मन भरुन आले,असंख्य दुर्बल लोकांची,कुष्ठरोग्यांची,अनाथांची माता त्या झाल्या त्यांची अहोरात्र सेवा करुन त्यांना मायेचा ओलावा दिला.निरांधारांना त्यांनी निवारा दिला.त्या नेहमी म्हणत मी रक्ताने अल्बनियन आहे,परंतु मी एक भारतीय आहे.श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी समाजवेचा वसा जपला.खर्या अर्थाने त्या सेवाकार्याची अनभिषिक्त सम्राज्ञी झाल्या.#mother teresa
त्यांच्या महानकार्याचा गौरव करण्यासाठी शब्दसुध्दा अपूरे पडतात.आज त्यांच्या स्मरणार्थ हेच शब्दसुमन वाहात आहे.तुमचे महानकार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहिल.
रुपाली वागरे/वैद्यनांदेड ९८६०२७६२४१