लोहा ; विनोद महाबळे
छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या महामानवाचे विचार आत्मसात करून पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण शिकवून आयएएस अधिकारी करावे असे प्रतिपादन नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पिंपळगाव येवला येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना केले.
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील पिंपळगाव येवला येथे आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोहन अण्णा हंबर्डे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते तथा सोनखेड गणाचे पं.स. सदस्य श्रीनिवास मोरे, गोपाळ मोरे, कैलास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर आमदार मोहना हंबर्डे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना आमदार मोहन अण्णा हंबर्डे पुढे म्हणाले की, दि. 1 ऑगस्ट रोजी नांदेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलो.व आज प्रथमच पिंपळगाव येवला येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती करीत आहे हे मी माझे भाग्य समजतो लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी मी आता आठ सप्टेंबर रोजी मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे
त्यावेळी मी विधीमंडळात हा प्रश्न उचलून धरून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.तसेच पिंपळगाव येथील दलित वस्तीतील समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊन कोरोना संपल्यावर समाज मंदिराचे ही बांधकाम करून देऊत गावातील नागरिकांना सोनखेड येथे बाजारपेठेला येण्यासाठी मधला मार्ग रस्ता व पुलाचे बांधकाम करून देऊत यासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन रस्त्यासाठी द्यावी त्यांना मावेजा सुद्धा देण्यात येईल व रस्ता झाल्यावर विकास सुद्धा होईल.छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी देशासाठी फार मोठे काम केले आहे. या महामानवाच्या जयंत्या करताना त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेऊन आत्मसात करावे मुलांना चांगले शिक्षण शिकवून आयएएस अधिकारी करावे असे आमदार मोहन हंबर्डे म्हणाले.http://yugsakshilive.in/?p=2038
तसेच यावेळी पं.स. गटनेते श्रीनिवास मोरे म्हणाले की महामानव हे कुण्या एका समाजाचे किंवा जातीचे नव्हते ते संपूर्ण देशाचे होते छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की मराठा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की बौद्ध समाज किंवा अण्णाभाऊ साठे म्हटले की मातंग समाज असे नाही या महामानवाला जातीच्या बंधनात अडकून ठेवू नका ते संपूर्ण देशाचे होते
समाजाचे होते ते कुण्या एका जातीसाठी नव्हते समाजासाठी नव्हते आज त्यांचे आपण जयंत्या करतो त्यांची प्रेरणा घेऊन आपण व आपल्या पुढील पिढ्या यांनी चांगले कार्य करावे असे पं.स गटनेते श्रीनिवास मोरे म्हणाले.
अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिले मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ दिली नाही ती गुजरातला जाऊ दिली नाही किंवा केंद्रशासित प्रदेश होऊ दिला नाही.तसेच पिंपळगाव येवला येथे विविध विकास कामे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे करतील त्यांच्यामागे लोकनेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण आहेत .
यावेळी दयानंद पाटील येवले ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष खंडू गोरे, उपाध्यक्ष मोतीराम गोरे, सुभाष पवार,कचरू पवार, सर्वजीत धुतराज,उमाजी गोरे, फालाजी गोरे, माधव गोरे, रघुनाथ धुतराज यांच्यासह जयंती मंडळ सर्व सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वजीत धुतराज यांनी केले.http://yugsakshilive.in/?p=2042