कंधार
दि:-15 /08/22 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या हस्ते आझादी का अमृत महोत्सव 75 वा निमित्त ठिक 7:30 वा ध्वजारोहण संपन्न झाला.
हर घर तिरंगा रॅली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर सर यांनी ग्रामीण रुग्णालयात आझादी का अमृत महोत्सव निमित्त कंधार शहरात दि:-13/08 22 रोजी 8:30 वा ध्वजारोहण करण्यात आले व हर घर तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी चौक ते महाराणा प्रताप चौक ते बस स्थानक पर्यंत काढून देश भक्तीपर गीत गायन व नारे देऊन तिरंगा झेंडा घेऊन सर्व कंधार शहरात रॅली काढण्यात आली व परत ग्रामीण रुग्णालयात येऊन रांगोळी काढण्यात आले व दि:-14/08/22 रोजी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व जनतेमध्ये तिरंगा लावण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले .तसेच दि:-15 /08/22 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या हस्ते आझादी का अमृत महोत्सव 75 वा निमित्त ठिक 7:30 वा ध्वजारोहण संपन्न झाला.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉ.रवीकिरण पोरे गजानन देशमुख महेश पोकले संतोष पदमवार डॉ.भगवान जाधव श्रीकांत मोरे गजानन पवार शाहीन बेगम नम्रता ढोणे दत्तात्रय गुडेमेवार निकहत फातेमा प्राजक्ता बंडेवार व सर्व आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने आवर्जून उपस्थित होते.
माजी सैनिक तालुका अध्यक्ष बालाजी चुकुलवाड अर्जुन कांबळे पोचिराम वाघमारे संभाजी कल्याणकर या सर्व माजी सैनिकांचा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्यांचे सर्व सहकारी मित्र ध्वजारोहणाला प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच 9:00 वा ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर नर्सेस फार्मासिस्ट व आरोग्य कर्मचारी यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.तसेच आज दि:-15/08/22 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले त्यामुळे ग्रामीण रुग्णालय कंधार येथे मानवी साखळीतून 75 वर्षे झालेले साखळी तयार केली. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी या स्वतंत्र दिनी अमृत महोत्सव करण्याचे ठरवले होते त्यामुळे पूर्ण भारत देशात आज आझादी का अमृत मोहत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले त्या वक्तृत्व स्पर्धेला ठिक 9:30 वा सुरुवात करण्यात आली ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टर नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या भाषणाच्या वाणीतून विविध प्रकारच्या मुद्यावर भाषण झाले त्यांचे देशावरील प्रेम वेगवेगळ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकण्यास मिळाली सामाजिक राष्ट्र भक्ती व स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार अन्याय भारताला स्वातंत्र्य मिळाले पण अजूनही जातीवाद आहे असे अनेक वक्ते यांच्या वाणीतून ऐकायला मिळाली त्यांच्या मधून प्रथम क्रमांक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाहीन बेगम तर द्वत्तीय क्रमांक प्रशांत कुमठेकर अधिपरीचारक यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक शितल कदम आणि अपर्णा जाधव यांनी पटकावला बक्षीसाचे स्वरूप गौरव प्रशती प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन शाल पुष्पहार घालून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर व सन्माननीय मान्यवर
श्री.एच.जि.नारलावार सर ( माजी केंद्रप्रमुख तथा बालभारती सदस्य महाराष्ट्र राज्य पथ्यपुस्तक मंडळ पुणे )
व श्री.एन.बि.बनसोडे सर ( उप मुख्याध्यापक मनोविकास विद्यालय कंधार) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच छोटा चिमुकला स्पंदन पांचाळ या बालकाने भाषण केले या चिमुकल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर व प्रो.गंगाधर तोगरे सर यांच्या हस्ते त्या बालकाला प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रो. गंगाधर तोगरे अँड.सिद्धार्थ वाघमारे राजेश्वर कांबळे पत्रकार बांधव यांची ही उपस्थिती होती.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाविन्यपूर्व कार्यक्रम राबवून कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.