फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ता.१५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ७:३५ वाजता जि. प. शाळेत भारतीय जवान अशोक शेळगावे , मारोती मंगनाळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले , त्यानंतर श्री बसवेश्वर विद्यालय मु.अ. बापूराव मंगनाळे यांच्या हस्ते , पशुपैद्यकीय दवाखाना येथे मु.अ. बालाजी केंद्रे यांच्या हस्ते , ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल येथे गंगाधर मंगनाळे यांच्या हस्ते तसेच से.स. सोसायटी , आरोग्य उपकेंद्र , सर्व अंगणवाडी केंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सर्वधर्म समभावतेचा संदेश देणारे देखावे सादरीकरण करत गावभर प्रभातफेरी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
प्रभातफेरी नंतर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील आजी , माजी भारतीय सैनिक आवर्जून उपस्थित होते. सरपंच विमलबाई मंगनाळे व ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे यांच्या उपस्थितीत जवान वसीम सरवर शेख , कपिल मानसिंगराव मंगनाळे , अशोक शिवाजीराव शेळगावे व भारतीय नौसेना दलात कार्यरत असलेले गुंडप्पा बसवेश्वर मंगनाळे तसेच माजी सैनिक मारोती माधवराव मंगनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक , शिक्षिका , अंगणवाडी सेविका, मदतनीस , आरोग्य कर्मचारी , आजी, माजी विद्यार्थी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . झेंडावंदन नंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व आजी , माजी सैनिकांचा , शेतकरी प्रतिनिधी चा , पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे यांनी हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.