कंधार :-
शहरातील विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था कंधार व श्री. माणिक प्रभु डोळ्याचा दवाखाना भवानी नगर कंधार यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 मोहरम निमित्त 179 जणाचे काँम्प्युरव्दारे मोफत नेञ तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
हुसेनी आशुरखाना छोटी गल्ली कंधार येथे डाँ. शेख शकील (D. opt MUHS), व त्याचे सहकारी हणमंत गुट्टे (Ot Assistant) आदिनी काँम्प्युटरव्दारे 179 स्ञी, पुरुष, लहान मुलांचे नेञ (डोळे) तपासुन रुग्णाना ड्राफ व मलम आणि इतर औषधी मोफत वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमीद मौलीसाब (माजी उपनगराध्यक्ष, कंधार) व मार्गदर्शक अब्दुल मन्नान चौधरी (नगरसेवक) आणि प्रमुख आतिथी म्हणून गफार खाँन, परदेशी मोहम्मद मगदूम, राम पवार, अँड. राहुल ढवळे, अँड. शेख निजाम, मोहम्मद सुलतान, धोंडगे, आजीमोद्दीन बागवान, बाबु सेठ, आतिक बागवान, शेख इमदात, गनी पेंटर है होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद ईरफान, उपाध्यक्ष मोहम्मद आतिक, सचिव अँड. मोहम्मद ईमरान व शेख सिराज अहमद, अहमद चौधरी, अब्दुल नईम, अब्दुल रहेमान, शेख जुनैद अहमद पाँशा, शेख सलमान आदिनी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाचे सुञसंचलन अँड. कलीम अन्सारी यांनी तर प्रास्तविक शेख अफजल आणि आभार प्रदर्शन शेख गौस बाबु मेकँनिक यांनी केले आहे.