मुंबई ; प्रतिनिधी
राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आमचे पहिले प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे घटक आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गेल्या दोन महिन्यात राज्याच्या अनेक भागातील अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. आम्ही तातडीने अतिवृष्टीग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. वेगाने पंचनामे सुरू झाले. अतिवृष्टीग्रस्तांना आता ३ हेक्टरच्या मर्यादेत एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील मिळेल. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व #कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन सुरू आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतले. लोकांच्या हिताची कामे थांबविलेली नाहीत. आरक्षणासाठी सरकार गंभीर असून शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, पाणी, घरे व कौशल्य विकासास प्राधान्य देत आहे
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला आज ध्वजारोहणाची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे