१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.समूह राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे – तहसिलदार व्यंकटेश मुंडे

कंधार ;

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा याला जोडूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात सकाळी ११ वा. स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून समूह राष्ट्रगीत गायन गायले जाणार आहे. यामध्ये कंधार लोहा तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे .

स्वराज्य महोत्सवाअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनासाठी यशस्वी अंमलबजावणी व्हावी यादृष्टिने सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. हे समूह राष्ट्रगीत गायन १७ ऑगस्ट रोजी सकाळी बरोबर ११ वा. एकाचवेळी

सर्व खाजगी शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, यामधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग उत्स्फूर्त असणार आहे. सकाळी ११ वा. राष्ट्रगीताला सुरूवात होईल व ११.१ मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, हे शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

समूह राष्ट्रगीत गायनाचा वेळी जाणते अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याबाबत सर्व स्तरावर काळजी घेण्याचेही आवाहन शासनाने केले आहे.

नागरिकांना दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. ते ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचेही आवाहन शासनाने केले आहे. सर्व खाजगी
आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, केंद्र व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे.

राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्गखोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रीत उपस्थित राहून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमात सहभागी तसेच कंधार येथिल शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड येथे मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *