खरे पाहिले तर वय जास्त झालं की वडिलांचा किंवा आईचा वाढदिवस हा मुलांना लक्षातच राहत नाही .पण आमचं तसंच झालं. आम्ही सगळ्यांचा वाढदिवस केला. पण नानांचा कधीच केला नाही. वडील म्हणतात हे मला आठवत नाही. की माझा वाढदिवस कधी आहे .पण आम्ही यावेळेस ठरवलं कॅलेंडर वर लिहिलं. तारखेला सातत्याने वाचत राहीलो कारण जो सर्वांना आधार देतो. जो सर्वाचे करत असतो .त्याच असंच असतं . पण आता आमची मुलं मोठी झाली .त्यांना वाटायला लागलं की आजोबांचा वाढदिवस करायला पाहिजे.
आज वडिलांनी 83 पार करून एकदम ताठ मानेन उभे टाकतात. कारण कारण त्यांना जे मुलांचे सुनांचे ,नातवाचे ,नातूचे अशा तीन पिढींच्या संगमा कडून प्रेम मिळत असेल तर मग त्या आजोबांचा रुबाब काय? हा वेगळाच !नातवांच्या सुनांच्या आवाजात नानांचा आवाज हा घरात घुमत असतो .नाना हा शब्द हा एवढा मोठा आधार आहे .की आमचा श्वास होऊन बसला आहे . अतिशय शांत ,प्रामाणिक असणारे माझे वडील याही वयात ताठ मानेने स्वाभिमानाने जीवन जगतात. कारण त्यांची मुलं,सूना , नातवे अजूनही शब्दाबाहेर नाहीत. यातच नानानच यश आहे.
देविदासराव लव्हेकर उर्फ नाना यांना आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून दीर्घायुष्य लाभो हीच माता रेणुका चरणी प्रार्थना!
नाना आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!
ओंकार लव्हेकर ( दैनिक चालू वार्ता,पुणे) मराठवाडा उपसंपादक)