कंधार : ऐतिहासिक जगतुंग समुद्र (तलाव) तुडुंब भरला असून सुमारे 40 वर्षा नंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुमारे अर्धा फुटाने सुरू झाला आहे.
अचानक पाऊस अथवा अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे .
यामुळे कोटबाजार, मानसपुरी, बहाद्दरपुरा शिवारात पाणी घुसण्याचा धोका असून त् शेती खरडून आणि खरिपातील पिके पाण्याखाली येवून खरडून जाण्याची व घरातही पाणी घुसण्याची भीती आहे.
राष्ट्रकुट काळातील जगतुंग समुद्राची निर्मिती हि नगराला पाणी पुरवठा, शेती सिंचन, पशुधनाला पाणी, किल्ला संरक्षण यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
मानसपुरी, कोटबाजार, बहाद्दरपुरा, कंधार या गावातील शेतकऱ्यांना या याचा फायदा होतो. पाणी विसर्ग सांडव्यावरून वाहत मानार नदीला जाऊन मिळते.
हा तलाव १९८३ साली तुडुंब भरून सांडव्यावरून सुमारे चार फूट उंचीने पाणी गेल होते असे नागरीकांनी सांगितले. त्यामुळे तलावाखालील अनेक गावातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. आता चार दशकानंतर पाणी सुमारे अर्धा फूट सांडव्यावरून जात आहे.
खबरदारी म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
काही दिवसापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी .डॉ विपीन ईटनकर यांनी या तलावास भेट देऊन पाहणी केली होती तसेच लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील या तलावास भेट देऊन पाहणी केली होती तर शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी लेखी स्वरूपाचे मागणी निवेदनाद्वारे केली होती .