कंधार तहसिल कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तहसिल कार्यालयात तहसिलदार यांच्या दालनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल व इंदीरा गांधी यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक व तहसिलदार व्यंकटेश मुंडे हस्ते पुष्पहार घालण्यात आले. आजच्या तरुणांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ . शरद मंडलीक यांनी यावेळी केले .
तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातून सदर एकता दौड-रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरुन बाजारमार्गे,छोटीदर्गा,मोठी दर्गामार्गे कंधारच्या ऐतिहासीक किल्ल्यापर्यत काढण्यात आली . यावेळी एकात्मतेचा संदेश देणा-या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला. श्री शिवाजी महाविदयालयाच्या गणवेशातील शिस्तबद्ध एन.सी.सी. विदयार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले.
भुईकोट किल्ल्यात हरीहर चिवडे-मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले तर तहसिलदार व्यंकटेश मुंडे व उपविभागीय अधिकारी यांनी एकात्मेचा संदेश देत रॅलीला संबोधीत केले व एकतेची शपथ उपस्थीत सर्वाना देण्यात आली. सुत्रसंचालन बारकुजी मोरे यांनी तर आभार प्रदर्शन मनमथ थोटे यांनी केले.
सन 2022 च्या स्वातंत्र्य दिना निम्मित मा.पंतप्रधान यांनी घोषीत केलेल्या पंचप्राण संकल्पनेमध्ये एकता ही एक संकल्पना आहे. मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या विचार व मूल्यांची जपवणूक करण्यासाठी राष्ट्रीय अमलबजावणी समितीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या छत्राखाली एकतेचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे व त्यामध्ये सर्वानी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.त्याच उद्देशाने तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी या एकता दौडचे आयोजन केले होते.
या एकता संदेश दौडमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलीक,तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे सहा.पो.नि.लोणीकर व पोलीस अधिकारी कर्मचारी, गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे व शिक्षणविभागातील विस्तार अधिकारी पांडेसर व शिक्षक, तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार,एकात्मीक बाल विकासचे खंदारे व इतर कर्मचारी, नगरपरीषदेचे ठेवरे,नायब तहसिदार संतोष कामठेकर, गगनर,पाठक,सर्वकार्यालयाचे प्रमुख तहसिल कार्यालय,उपविभागीय अधिकारी कंधार कार्यालय,पोलीस प्रशासन,शिक्षण विभाग, एकात्मीक बाल विकास,पंचायत समीतीचे आऊलवार, व इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच माजी सैनीक संघटनेचे बालाजी चुकुलवार,कांबळे व इतर जेष्ठ माजी सैनीक,महाराष्ट्र खाजगी मुख्याध्यापक संघटनेचे शहापुरेसर,दिगंबर वाघमारे,अफसरसर सह इतर पदाधिकारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरीक,एन.सी.सी.विदयार्थी, मंडळअधिकारी, तलाठी,कोतवाल महसूल कर्मचारी व यांच्या सहभागाने सदर एकता दौड यशस्वीरीत्या संपन्न झाली .
ही एकता दौड यशस्वी करण्यासाठी तहसिलदार व्यंकटेश यांच्या आयोजनातून नायब तहसिलदार संतोष कामठेकर,राजेश पाठक, पेशकार अविनाश पानपट्टे,मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगांवकर,महाजन,शेख एस.आर.,शिंदे, पटणे,जेहरुनीसा बेगम, तलाठी नरमवाड,बरोडा, केंद्रे,रावीकर,मुंडे,मद्देवाड,जाधव चिलकेवार,दुधाटे,बोधगीरे,शिंदे,मेतलवाड,मनमथ थोटे गुरुजी, बारकुजी मोरे,तिरुपती मुंगरे,गणेश नरहीरे, पि.एम. जोंधळे, श्रीनीवास ढगे, माधव पवार, एच.राऊत,लखमावाड,अजीत केदार,वाघमोडे,छत्रपती गायकवाड,पांचाळ,सुरेश वंजे, चावरे,व्यंकठ चिवडे,जीलानी, मुसांडे,पितळे आदींनी प्रयत्न केले.
One thought on “” तहसिल ते भुईकोट किल्ला ” एकता संदेश दौड ला कंधारात प्रतिसाद ..! महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज – उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलीक”
सुंदर वृत्त