भाजपची जुनी टिम एकनाथ पवार यांच्या नेतृत्वात काम करणार ….! भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीची प्रॉपर्टी नाही – एकनाथ पवार

 

लोहा -कंधार मतदार संघात जुन्या व निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वगळून एकसूत्री कार्यक्रम चालू आहे. भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीची प्रॉपर्टी नाही, हा लोकशाही वर चालणारा पक्ष आहे. मी गेली तीस वर्षे भाजपात काम करत आहे त्यामुळे मला भाजप चांगलीच माहित आहे . भाजपच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बाहेर न राहता पक्षात सक्रिय होऊन पुन्हा जोमाने काम करावे व लोहा कंधार मतदार संघात भाजपची ताकद वाढवावी असे आव्हान भाजप प्रवक्ते एकनाथ पवार यांनी निष्ठावंत जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपा गटनेता तथा महाराष्ट्राचे प्रवक्ते एकनाथ पवार हे गेल्या तीन वर्षापासून ते लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत . 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने ते जोरदार तयारी करत आहेत. याच अनुषंगाने दिवाळीच्या निमित्ताने कंधार तालुक्यातील जुन्या निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 29 नोव्हेंबर रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आले या बैठकीला भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून आपल्या व्यथा मांडल्या. या जुन्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ पवार म्हणाले की, मी गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टी काम करत आहे .2014 ची विधानसभा निवडणुक कमळ निशाणी वर भोसरी मतदारसंघातून लढवली,माझा केवळ साडेतीन हजार मतांनी पराभूत झालो. हा पराभव फार काही मतांनी मोठा नव्हता.मी ठरवले असते तर 2019 च्या निवडणुकीत या भोसरी मतदारसंघातून आमदार झालो असतो किंवा येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीतही मी भोसरी मतदारसंघातून आमदार होऊ शकतो. लोहा -कंधार मतदारसंघ माजी जन्मभूमी असल्याने मला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे या उद्देशाने मी लोहा -कंधार मतदार संघात काम करत आहे ,आणि येणारी निवडणूक मी शंभर टक्के लढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत दादा पाटील, पंकजाताई मुंडे यांना विचारूनच मी या ठिकाणी आलो आहे. भाजप कोणत्या निकषावर उमेदवारी देते हे मला चांगलेच माहित आहे त्यामुळे भाजप मला शंभर टक्के उमेदवारी देणार आहे. कंधार तालुक्यातील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना कोणीही विश्वासात घेत नसल्याने आज अनेक जुने निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षाचे काम न करता नाराज होऊन घरी बसले आहेत. भाजपा जुन्या व निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यावर अन्याय करणारा पक्ष नसून हा लोकशाही वर चालणारा पक्ष आहे. या पक्षाचा कोणत्याही एका व्यक्ती मालक होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घरी न बसता जोमाने कामाला लागून या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवावी असे आव्हान एकनाथ पवार यांनी केली आहे

या बैठकीला भगवान महाराज व्यास, माजी तालुका अध्यक्ष धोंडीबा भायगावे, माजी तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील गव्हाणे, शरद मुंडे ,शिवशाब देशमुख, कोंडीबा बनसोडे, उपस्थित होते यावेळी हे सर्व एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली कंधार मध्ये भाजपचे काम करणार असल्याचे गवाही दिली. काही दिवसातच कंधार तालुक्यातील सर्व जुन्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ पवार यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *