सिंदखेड राजा बुलढाणा दि. 30 सप्टेंबर रविवारी पाडळी शिंदे गावी आयोजित शेतकरी मेळाव्यात विदर्भ मराठवाडा व खानदेशातील शेतकरी यांची उपजीविका व कापूस सोयाबीन पिकावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस व सोयाबीन पिकाला एफ. आर. पी.(FRP) चा कायदा लागू करावा अशी मागणी शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मेळाव्यात केली याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने सिंदखेड राजा तालुक्यातील पाडळी शिंदे गावात शेतकरी मेळावा आयोजित केला होता मेळाव्याला कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योजक शेतकरी व बीज उत्पादक शेतकऱ्यासह शेतकरी प्रश्न कार्य करणाऱ्या अनेक प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते.
या शेतकरी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मेळाव्यातील शेतकऱ्यांच्या भावना व या पिकाच्या बाबतीतले विदर्भ मराठवाडा व खानदेशातील परिस्थिती लक्षात घेऊन प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मागणी केली असल्याचे समजते. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राजकीय सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांनीही स्वतःच्या हितासाठी सैरभैर राजकारण व बिनकामी चर्चेत अडकून न बसता अनेक निकष, अटी, व अडथळे ओलांडून मिळणाऱ्या मदतीसाठी वाजवी लक्ष देऊ नये व स्वतःच्या शेती व्यवसायाला फायद्याचे करण्यासाठी संघटित रित्या चळवळ उभारून सरकारवर दबाव आणावा असे आव्हान केले. राष्ट्रीय नेते व माजी कृषिमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात शेती व शेतकऱ्यांच्या केलेल्या सर्वाधिक कार्याची प्रशंसा करत शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आजही आणि पुढेही पवार साहेबांच्या विचारांची आवश्यकता स्पष्ट केले.
कापूस व सोयाबीन हे पिके विदर्भ मराठवाडा व खानदेशातील शेतकऱ्यांना वाचवू शकतात त्यामुळे शंकर अण्णा धोंडगे यांनी ही मागणी सरकारकडे केली या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा अँड नाझेर काजी साहेब व जेष्ठ शेतकरी कार्यकर्ते व नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार यांचे प्रासंगिक मार्गदर्शन झाले.
या शेतकरी मेळाव्याचे आयोजन बुलढाणा राष्ट्रवादी किसान सभेचे उपाध्यक्ष शिवानंद शिंदे यांनी केले होते अनेक मान्यवर असं बुलढाणा राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मा राजीव जावळे पाटील, मा नितीन नाना शिंगणे, गजानन पवार, पुरुषोत्तम पडद्यान, उद्धवराव मस्के, गजानन चेके, गजेंद्र शिंगणे, गणेशराव बुरकुल, अमोल भट, सोपानराव चेके, श्री अजित बेगाणी, यांचे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री राजीव जावळे पाटील यांनी केले व आभारही मानले……