रात्री अपरात्री फोन सुरू ठेवणे आणि कोणत्याही वेळी रिंग वाजल्यास फोन उचलण्याची सवय सर्वांनी लावून घ्यावी

काल पहाटे संभाजी ब्रिगेड संभाजीनगरच्या महिला कार्यकर्त्यांचा गेवराईहून (जिल्हा बीड) संभाजीनगर कडे येताना सुमारे बारा किमी पुढे आल्यानंतर भीषण अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना काकाजी गाडेकर, त्यांचे सहकारी, प्रत्यक्षदरशींनी अंबुलन्स बोलावून गेवराई येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.

पहाटे तीन वाजता मला या अपघाताची माहिती वैजापूर संभाजी ब्रिगेडचे विजय आघाडे यांनी माहिती दिली.

त्यानंतर मी गेवराई येथील संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे, बंडू खंडागळे, श्याम कुंड, आधार माणुसकीचा फाऊंडेशनचे पोलीस अधिकारी रमेश पवार सर, श्याम खुरुड, एड. कल्याण काळे यांना सदर अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तेवढ्या पहाटे. सर्व कार्यकर्ते रुग्णालयाकडे धावले. जे बाहेर होते त्यांनी आपल्या स्थानिक मित्रांना फोन करून जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी पाठवले. यावेळी अखिल भारतीय छावाचे कार्यकर्ते – पदाधिकारी यांचीही मोलाची मदत झाली.

बंडू खंडागळे सरांनी जखमींवर उपचार करणाऱ्या डक्टरांशी माझे बोलणे करून दिले. कुणाच्याही जीवाला धोका नसला तरी अपघाताची तीव्रता जास्त असल्याने शरीरातील काही हाडे मोडली आहेत आणि काही जणांच्या मेंदूला मार लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. आमच्याकडे सिटी स्कॅन नसल्याने अर्जंट सिटी स्कॅन करावे लागेल त्यासाठी आम्ही सर्वांना अंबुलेन्सने संभाजीनगर येथील एम जी एम हॉस्पिटलला पाठवत असल्याचे कळवले.

इकडे संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, संजय सोमवंशी, रेणुका सोमवंशी, मी आणि रुग्णांचे नातेवाईक एम जी एम हॉस्पिटलला जावून थांबलो. जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत. कुणाच्याही जीवाला धोका नाही.

रात्री अपरात्री फोन सुरू ठेवणे आणि कोणत्याही वेळी रिंग वाजल्यास फोन उचलण्याची सवय आपण सर्वांनी लावून घ्यावी. किमान समाज जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तरी लावून घ्यावी. या सवयीमुळे कुणाला तरी अत्यंत अडचणीत असताना मदत मिळू शकते.

या अपघातात ज्या ज्ञात – अज्ञात लोकांनी मदत केली त्यांचे मी व्यक्तिशः आणि संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र यांचेकडून आभार मानतो.

 

@ डॉ. बालाजी जाधव
प्रदेश संघटक : संभाजी ब्रिगेड
मो. ९४२२५२८२९०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *