अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
काव्यानंद प्रतिष्ठान पुणे व साईश इन्फोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराखडी प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ चिंचवड पुणे येथे येथे प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री.तुकाराम पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री.वि.ग.सातपुते आप्पा तर प्रमुख उपस्थिती श्री.डाॅ. राजेंद्र कांकरिया, सतिश रानडे, शिवाजी सांगळे उपस्थित होते.
बाराखडी या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाकरीता मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी ता. अहमदपूर येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत कवी श्री.गणेश गुलाबराव चव्हाण यांनी काव्यलेखन केले असून , सदरील प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून त्यांच्या ‘गड्या आपुला गाव लयं झ्याक भारी ‘ ही गावाचा वर्णन करणारी तर ‘रूढी परंपरेच्या बंधनात अडकून राहतेस किती..?’ अशी स्त्री जीवनावर परखडपणे विचार व्यक्त करणारी अशा दोन कविता प्रकाशित झाल्या आहेत. काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ दरम्यान आयोजित कवी संमेलनात ‘जगतात सारेच स्वतःसाठी’ ही कविता सादर करून कवी गणेश चव्हाण यांनी उत्स्फूर्त दाद मिळवली व उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी काव्यानंद प्रतिष्ठान,पुणे चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील खंडेलवाल व ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कवी गणेश चव्हाण हे सांगवी तांडा येथील रहिवासी असून ग्रामीण भागांतून नवोदित कवी घडत असल्याने साहित्य क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक श्री.एन.डी.राठोड सर, प्राध्यापक श्री.आमलापुरे सर, मुख्याध्यापक श्री.पी.आर.पवार सर, श्री.आर.पी कुलकर्णी,श्री.आंधळे सर, कवी विजय पवार समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी मित्र परिवार यांच्याकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.