शेतकऱ्यांची वीज खंडित केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा महावितरणला इशारा

कंधार (प्रतिनिधी)महावितरणकडून सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. कंधार तालुक्यासह इतरही तालुक्यातील शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. ओला दुष्काळ, सरकारकडून राज्य अत्यल्प अनुदानव नुष्कान होऊन देखील विमा न मिळाल्यामुळे .कंधार तालुक्यासह इतरही तालुक्यातील शेतकरी सध्या त्रस्त आर्थिक संकटात सापडला असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये, न अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

 

याबाबत उप अभियंता विद्युत महावितरण कार्यालय कंधार निवेदन देण्यात आले . या निवेदनात शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर पा. जाधव, विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, पंडीत देवकांबळे, सचिन जाधव, जेष्ठ शिवसैनिक जीएम पवळे, रमेश मुकनर, ज्ञानेश्वर मुकनर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *