लोहा – विनोद महाबळे
सध्या देशासहित राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सण उत्सव धार्मिक कार्यक्रम हे साधेपणाने गर्दी न जमता साजरे करावे.सध्या मोहरम गणपती हे सण चालू असून जनतेने एका समवेत न येता आपापल्या घरीच प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत साधेपणाने सण उत्सव घरिच साजरे करावेत व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावेत.असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते व लोहा कंधार चे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले आहे
.प्रशासनाच्या वतीने काढलेल्या सूचनेनुसार जनतेने सूचनेचे पालन करावे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने शक्यतो घरीच राहून गणेश उत्सव व मोहरम सण उत्सव साजरे करावेत,सार्वजनिक ठिकाणी एकत्रित न येता प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता न होता,कुटुंबातील व्यक्तीची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आ रोहिदास चव्हाण यांनी केले आहे.
आजच लोहा प्रशासनाने लोहा शहरातील कोरोना ग्रस्तांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाच दिवसाचा कडकडीत बंदची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर लोहा कंधार मतदार संघातील तमाम बांधवांनी गणेश उत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरे करावे असे आव्हान माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले आहे.