लोहा – विनोद महाबळे
सध्या लोहा शहरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आतापर्यंत लोहा शहराची संख्या १०० पार झाली असून जनतेने घाबरू जाऊ नये व तसेच आपली व आपआपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी , सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन लोहा नप चे माजी उपाध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले आहे.
स्थानिक प्रशासन आपल्या मनावरचे निर्णय घेत आहेत तरी जनतेने स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहू नये,व तसेच आपआपली व आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घ्यावी,तसेच स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहू नये.तसेच लोहा नप चे माजी उपाध्यक्ष सोनू संगेवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले की
लॉकडाऊन चा अधिकार नगर परिषदे ला कोण दिला- माजी उपाध्यक्ष सोनू संगेवार
तालुक्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी या संबंधी माहिती दिली का?जर नगर अध्यक्ष ने लॉक डाऊन जाहीर केला असेल तर त्याबद्दल सर्व नगरसेवकांना माहिती दिली आहे का?लॉकडाऊन करण्यापूर्वी नगर परिषदेने ज्यांचं पोट हातावर आहे अश्याना राशन वाटप केल का,सरकार ने जेव्हा लॉकडाऊन केल होत तेव्हापासून नगर अध्यक्ष व नप प्रशासन कुठे होत, आज अचानक झोपीतून उठल्या सारखं लॉक डाऊन का? जर शहरात रुग्णांची संख्या वाढली असेल तर तशी आकडेवारी नगर पालिकेने दिली आहे का?
मागच्या काही दिवसापासून पेशंट वाढले असतील तर ते कोणत्या भागात वाढले तिथे कान्टमेन्ट झोन किंवा हॉटस्पॉट परिसर म्हणून नप ने काय उपाययोजना केली आहे?सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायजर ची व्यवस्था करण्यात नप अपयशी ठरली? लॉकडाऊन हा उपाय नाही, सोशल डिस्टनसिंग हा मुख्य उपाय असताना, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स बाळगण्यासाठी नगर परिषद ने नेमक काही केल होत का?मार्केट बंद हा यावर उपाय नाही , तर चालू मार्केट मध्ये सोशल डिस्टनसिंग राखायला लावणे हे नप च मुख्य काम असताना ते न करता, हुकूमशाही थाटात लॉकडाउन करून छोट्या व्यापारांच नुकसान करणे कितपत योग्य असा सवाल यावेळी सोनू संगेवार यांनी नगर परिषद व पदाधिकारी यांना केला आहे.