भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने पारित केले आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. २६ नोव्हेंबर हा भारताचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सार्वजनिक वाचनालय, नगरपरिषद कंधार येथे २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार स.ग्रंथपाल व श्री बालाजी चव्हाण (अभ्यासक विद्यार्थी ) यांनी संविधान फलकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तसेच संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत वाचक संख्या उपस्थित होती. तसेच ग्रंथालय कर्मचारी श्री दत्ता ऐनवाड, किशन भालेराव, श्रीमती कमलबाई जाधव, उपस्थित होते.