26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीने खूप खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्णपणे तयार करण्यात आली होती. परंतु दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी संविधान दिननिमित्त प्रियदर्शनी माध्यमिक कन्या शाळेत संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन कार्यक्रमात केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय मुलींचे कंधार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण व अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्या सौ. राजश्री शिंदे, किरण बडवणे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी उपस्थित होते.पुढे बोलताना भोसीकर म्हणाले की,संविधान तयार व्हायला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले, ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले. भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. देशात राहणार्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता टिकून राहावी. तसेच सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आली. भारताच्या राज्यघटनेत प्रस्तावना लिहिली गेली आहे, त्याला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणतात. ही प्रस्तावना भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते.
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान होते. म्हणून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून आज आपण संविधान साजरा करत आहोत. देशातील तरुण पिढीमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो असे संजय भोसीकर म्हणाले.यावेळी शाळेतील शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी आदी उपस्थित होते.