सुप्रसिद्ध अभिनेत्री कु.माधुरी लोकरे यांना, तोत्तोचान तेत्सुको कुरोयानागी ग्रंथ भेट..!

” आता तू या शाळेची” मुख्याध्यापकांकडून ऐकल्यावर दुसऱ्या दिवशीची वाट पाहणं तोत्तोचानला कठीण झालं होतं. यापूर्वी कुठल्याच दिवसाची तिनं इतक्या उत्कंठतेने वाट बघितली नसेल. छोट्या तोत्तोचाननं ‘तोमोई’ मधील, जे वातावरण अनुभवलं होतं ते तिला आणि तिच्या सवंगड्यांना खूप आवडायचं. त्यांचे मुख्याध्यापक गणवेश आणि साचेबद्ध अभ्यासापेक्षा त्यांच्या चौरस आहाराला महत्व द्यायचे. मुलं संगीत शिकत, खेळात भाग घेत, शिबिराला जात, नाटक करत, मोकळ्यावर स्वयंपाकाचा आनंद घेत. काही मुलं चांगली गात, तर काही खेळात पुढे होती. त्यांच्यात एक भावी डॉक्टरही होता..!

 

 

 

अन् या साऱ्यांचं कारण होतं स्नेहशील आणि कल्पक मुख्याध्यापक कोबायाशी. ते तोत्तोचानला नेहमी म्हणत, ‘तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस.’ असंच प्रोत्साहन ते इतरही मुलांना देत असतील. कोबायाशीचं प्रेम होतं मुलांच्या उत्साही जीवनाचा एक मूलाधार. तोमोईची शाळा म्हणजे घरापासून दूर असं एक घर होतं..!

कालची चिमुरडी तोत्तोचान आज जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानागी या नावानं ओळखली जाते. तिच्या शाळेबद्दल ती खूप काही सांगत राहते. युनिसेफच्या या सद्भावना दूतापाशी जपानकडून जगाला देण्यासारखं खूप काही आहे. मग ते शिक्षक असोत, पालक असोत किंवा मुलं..!

हे लोकप्रिय जपानी पुस्तक विश्वाला संदेश देतंय-

हजारो फुलं फुलू दे
विचारधारांचा संघर्ष होऊ दे
विश्वाला नवजीवन मिळू दे

 

 

 

“दानव” नाटकात आपली अतिशय महत्वाची भूमिका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कु. माधुरी लोकरे यांनी साखारली त्यांच्या भूमिकेचे कौतुक व्हावे. आणि त्यांना अनेक प्रेरणा मिळावी म्हणून, तोत्तोचान तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद- चेतना सरदेशमुख-गोसावी हा ग्रंथ, दिनांक: 24 नोव्हेंबर 2022 रोजी. स्थळ कुसुम नाट्यगृह, नांदेड येथे युवा साहित्यिक – सोनू दरेगावकर, नांदेड यांच्याकडून ग्रंथ भेट देण्यात आला. यावेळी, “दानव” नाटकातील कलावंत. सुनंदा डीघोळकर, कार्तिक खैरे, रणजित आगळे, हरिभाऊ कदम, गोविंद मोरे, अतुल साळवे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन कपाळे यांची उपस्थिती होती..!

 

 

 

– युवा साहित्यिक: – सोनू दरेगावकर, नांदेड..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *