नक्की कसं रहावं??
हा प्रश्न विचारलाय माझी वाचक जी डॉक्टर आहे आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांना मॉडर्न राहायला आवडतं पण लोक म्हणतात , डॉक्टर , लेखक ,कवी यांनी साधं रहायचं.. यावर त्यांनी माझं मत लिहायला सांगितलय..
मला नेहमी वाटतं , आयुष्य आपलं आहे त्यामूळे त्याचा निर्णय आपण घ्यायचा.. कोणीही कोणाला फुकटचे सल्ले देउ नयेत.. कोणाला आवडलं नाही तर त्याने त्या व्यक्तीकडे , त्याच्या विचाराकडे आणि पेहरावाकडे दुर्लक्ष करावं पण वाईट शब्दानी व्यक्त होवु नये कारण सोशल मिडीयावर बऱ्याचदा खूप वाईट शब्द वापरून ट्रोल केलं जातं पण हे लक्षात ठेवावं की karma returns Again .. हेच उलटुन एक दिवस तुमच्याकडे येणार आहे.. कुठेही व्यक्त होताना शब्द वापरताना अनेकदा विचार केला पाहिजे..
मला वाटतं कपड्यावरुन माणसाला जज करण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व पहावं आणि कर्तृत्व महान असेल तर ते आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करावा..
शिक्षिका बिकिनीत शाळेत नक्कीच जाणार नाही तिला कळतं कुठे कुठले कपडे घालावेत तसच लेखिकेने फक्त साडीत रहावं किवा डॉक्टरने पंजाबी ड्रेसवर रहावं याला काहीच अर्थ नाही..तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे.. तिला कॅरी करता येणारे कपडे तिने घालावेत आणि दुसऱ्याला ऑकवर्ड होणार नाही असं वागावं..
स्टेजवर बसायचे असेल आणि शॉर्ट ड्रेस घातला आणि तो मग सारखा खाली ओढत राहायचा.. त्यापेक्षा तिथे पूर्ण कपडे घालुन जावेत.. काय प्रसंग आहे त्यानुसार पेहराव हवा आणि आपल्या व्यक्तीमत्वाला साजेसा हवा.. यामधे मतभिन्नता नक्की असेल .. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पूर्ण कपड्यात रहाणारी व्यक्ती चारित्र्यसंपन्न आणि छोट्या कपड्यात रहाणारी चारित्र्यहिन हे चुकीचे लेबल आहे..मला जसं पाहिजे मी तशी रहाते.. त्यामुळे प्रत्येकाने हेच केलं तरच आनंदी राहु..तुम्ही तुमची मते नक्कीच व्यक्त करु शकता …