शेकापूर येथील  महात्मा फुले विद्यालयात पर्यवेक्षक रामराव वरपडे यांचा सेवापुर्ती सत्कार संपन्न

कंधारः- प्रतिनिधी 

        शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक रामराव वरपडे यांचा  सेवापुर्ती सत्कार सोहळा निमित्त  सपत्नीक सत्कार करण्यात आला.

     या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष तथा मा.जिल्हा परीषद सदस्य नांदेड संभाजीराव पा. केंद्रे  तसेच  शिवसेना नेते मुक्तेश्वरभाऊ धोंडगे ,मा. शिक्षण संचालक म.रा पुणे प्रा.डाँ. गोविंद नांदेडे , अति.मुख्यकार्यकारी अधिकारी  शिवाजीराव कपाळे , जिल्हा परीषद सदस्य मा.प्रवीण पाटील चिखलीकर ,   जि.प.सदस्या सौ .प्रणिताताई देवरे ,संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.तारामतीबाई केंद्रे , ,मा.कृषीअधिकारी नारायण गुट्टे ,प्रा.डाँ.व्यंकटराव मुंडे , विकास अधिकारी एल.आय.सी.सिडको नांदेड मा.ज्ञानेश्वर थेटे तसेच संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे मा.सरपंच शिवाजीराव पा.केंद्रे आणि  संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.सौ. डाँ. गंगासागर गित्ते ,कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मा.अंगदराव केंद्रे , मा.नगरध्यक्षा अनुराधा केंद्रे , प्राचार्य किशनराव डफडे ,सरपंच शेकापूर सौ.मिराबाई संजय भुस्कटे , संगमवाडीच्या सरपंच सौ.चांगुनाबाई घुगे , मा.सरपंच बाळासाहेब गर्जे ,  प्राचार्य  मोतिभाऊ केंद्रे या सर्व मान्यवरांच्या हस्ते , सत्कारमुर्ती   पर्यवेक्षक रामराव वरपडे व त्यांच्या पत्नी सौ.लीलाताई रामराव वरपडे  यांचा सपत्नीक जोड आहेर देऊन सत्कार करण्यात आला. 

            प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी प्रास्ताविक सादर करीत आसतांना म्हणाले की ,सत्कारमुर्ती रामराव वरपडे सर यांनी  नेहमी कार्य तत्पर राहून शाळेची  सेवा निस्वार्थ पणे केली आणि नेहमी अध्यापन मनोरंजक  पध्दतीने कले असे विचार त्यांनी व्यक्त केले . पुढे बोलताना मुक्तेश्वर धोंडगे म्हणालेकी वरपडे सरांनी 34 वर्षे सेवा केली पण यापुढची कार्यकिर्द कोणत्या पक्षासोबत राहील असे शब्द टाकुन राजकीय टोले बाजी केली व पुढील समाजाची सेवा करावी .  प्रणिताताई देवरे म्हणाल्याकी वरपडे सरांनी शैक्षणिक कार्य खुप चांगले केले तसेच  गणिता मधील भुमिती सारखा कठीण विषय सोप्या पदतीने अद्यापन करून गणित विषयाची गोडी निर्माण केल्यामुळे  तोंड भरून कौतुक केले यापुढची वरपडे सरांची नवीन खेळी भाजपा सोबत आसेल आसे त्या म्हणाल्या .  

 विध्यार्थांनी व समाजाने  दैनंदिन जिवना मध्ये गणिताचा वापर आपल्या जिवना मध्ये कसा करावा या संबधीचे मार्गदर्शन विध्यार्थांना दरोजच्या अद्यापना मधुन वरपडे सरांनी आज पर्यंत केले आहे असे मत प्रविण पाटील चिखलीकर यांती मांडले  .

       यावेळी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी पुढे बोलताना म्हणालेकी मा. संभाजीराव पाटील केंद्रे साहेब हे महात्मा फुले ,डाँ .बाबासाहेब आंबेडकर ,माहात्मा गांधी यांच्या   स्वपनांची पुर्तता करण्यासाठी ग्रामिण भागात संस्थेची उभारनी करून गोर गरीब विध्यार्थांचा शैक्षणिक विकास साधण्याचे कार्य केले   आजपर्यंत त्यांचे सर्व कामे अहींसेच्या पध्दतीने केले तसेच विध्यार्थांनी जास्तीचा अभ्यास करून उच्च पदावर जाण्याच्या शुभेच्छा दिल्या   आणि भारताच्या यशात मुंलीचे स्थान सर्वोतम रहाण्यासाठी परीश्रम घेऊन वैद्यकीय क्षेत्रात जाऊन गोर गरीबाची सेवा करण्याची कामे यावे शेतकरी पालकांनी आधुनिक युगात विध्यार्थां बदल जागुरूक असले पाहीजे तसेच तत्कालीन परीस्थितीत शेकापूर येथील महात्मा फुले शाळेत विज्ञान प्रदर्शन स्पर्धेच्या वेळी 1200 मुंलाना निवासी राहाण्याची व जेवणाची मोफत सुविधा केल्या मुळे जवळ पास  700 ते 800 विध्यार्थी शासकीय कर्मचारी व अधिकारी पदावर रूजु झाले  म्हणुन प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे यांचे शब्द सुमनानी तोंड भरून कौतुक केले आणि चिकीत्सक  व आभ्यासु प्राचार्य म्हणुन मत व्यक्त केले. तसेच वरपडे सरांच्या अध्यापनाचा व कार्याचा गौरव करून  कौतुक केले  .

 तसेच संस्थेचे सचिव शिवाजीराव पा.केंद्रे म्हणाले की शेकापूर परीसरातील शिक्षणाची स्वप्न पुर्ण करण्यासाठी मा.संभाजीराव पा.केंद्रे यांनी   इयत्ता 5 वी  ते 12 वी आणि B,A.ते M,A. पर्यंतचे शिक्षणाचे दरवाजे सर्व वाडी तांड्याच्या व दिन दुबळ्या  लोंकासाठी खुले केले आहे असेही ते म्हणाले आणि सत्कारमुर्ती रामराव वरपडे सर हे अष्टपैलु शिक्षक असुन कोणत्याही विषयावर प्रभुत्व होते संस्कृतीक विभाग प्रमुख असल्यामुळे विध्यार्थां मध्ये
 कलेची आवड निर्माण करून संस्कृतीक विकास घडविण्याचे कार्य केले . 

व सत्कारमुर्ती बदल मनोगत  अति.मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी शिवाजीराव कपाळे ,  मा.नगरध्यक्षा आनुराधा केंद्रे ,संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.डाँ.गंगासागर केंद्रे , आंगद केंद्रे ,मुख्याध्यापक मोहन फाजगे ,चिञरेखाताई गोरे इत्यादिंनी मनोगत व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

  यावेळी  अध्यक्षीय समारोपा वेळी मा.संभाजीराव पा.केंद्रे म्हणालेकी शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी देशात आणि विदेशात मोठमोठ्या पदावर कार्यरत असल्याममुळे  शाळेचे नाव गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहोचले आहे विद्यार्थांना प्रेरीत करण्यासाठी जिल्हा चे खा.प्रताप पा.चिखलीकर व मी स्वताः एकञ हातात हात घालुन खुप चांगले काम काँग्रेस मध्ये असतांना तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने कार्य केले आसेही ते म्हणाले व  सत्कारमुर्ती रामराव वरपडे सरांचे कार्य चांगले आहे .म्हणुनच परीसरातील विध्यार्थांच्या व पालकांच्या  मनात घरकरून नावलौकिक केले  असे म्हणुन शुभेच्छा दिल्या.

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.प्रर्यवेक्षक वसंतराव केंद्रे , व्यंकटराव पुरमवार , प्रा.अरूण केदार ,आमित लोंड  , साहेबराव काळे , चंद्रकांत पडलवार  , प्रा.सुर्यकांत गुट्टे ,अदिसह शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले तर सुञसंचलन प्रा.अरूण केदार यांनी केले  आभार व्यंकटराव पुरमवार यांनी मांडले .व वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *