मालेगाव : जिल्हा परिषद हायस्कूल,मालेगाव ता.अर्धापूर जि.नांदेड येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची “निसर्ग सहल” या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेतील उपक्रम राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील “अतुल कृषी पर्यटन”क्षेत्राला भेट देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना कृषी,जलसंवर्धन, विविध पिके व लागलागवड आणि शेततळे या संदर्भात अतुल कृषी पर्यटनाचे संचालक विकास देशमुख मालेगावकर यांनी माहिती दिली. निसर्ग सहलीच्या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात शाळास्तरावरील घटक चाचणी घेण्यात आली. ती संपल्यानंतर सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था मालेगाव येथील वृक्षमित्र फाउंडेशनचे ईश्वर पाटील मालेगावकर यांनी केली होती.
यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. तेजस्विनी आझादे आणि कु. शुभांगी लोखंडे यांनी देशभक्तीपर गीतांचा आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. सहलीतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी.एम.सूर्यवंशी व वर्गशिक्षक शिवा कांबळे यांनी मार्गदर्शन केले..