नांदेड ; शिक्षक -विद्यार्थी -पालक यांच्यामधील अंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहली मध्ये पालकांचाही समावेश करून या सहलीचे आयोजन करण्यात आले आले. कोरोना नंतर प्रथमच सॅटॅलाइट डिजिटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड.नांदेड येथील मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेकार यांनी या शाळेची वारंगा गार्डन येथे महिला पालकांची विद्यार्थ्यांसह सहलीचे आयोजन केले आहे .
शालेय शिक्षण घेत असताना शालेय सहल हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो. पण यात काहीतरी नवीन्य यावे म्हणून या शाळेने महिला पालकांसह या सहलीचे आयोजन केले आहे. क्षेत्रभेट असो वा शालेय सहल यातून शिक्षक- विद्यार्थी पालक यांच्या उत्तम अशी अंतरक्रिया घडून यावी म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य असे संगोपना संबंधित मार्गदर्शन केले जाणार आहे. या.नितीन सोनकांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल घेऊन जाण्यात येणार आहे.