दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडेरायाच्या यात्रेला दिनांक 22 गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला असून काल यात्रेत भव्य पशुप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले होते या पशुप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर हे गेले असता पशु प्रदर्शनात दाखल झालेल्या हजारो अश्व ,श्वान, शेळी, कोंबडे, यांना व इतर पशु पक्षांना नांदेड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केलेली थातूरमातूर सुविधा पाहून आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर यांच्या वर त्रिव संताप व्यक्त करत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर यांना खडे बोल सुनावत चांगलीच खरडपट्टी केल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यात खळबळ उडाली आहे, आमदार शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी पशु प्रदर्शनातील विविध प्रांतातील आलेल्या अश्व,श्वान मालकांची अस्तेवाईक विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यात्रेत पशु मालकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे काही पशु मालकांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच आमदार शिंदे यांनी तात्काळ नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माळवदे यांना बोलावून परत मुख्य कार्यकारी अधिकारी माळवाडी यांच्यासह पशु प्रदर्शनाच्या मैदानावर जाऊन पशु मालकांच्या विविध समस्यांचा पाढा जि.प चे मुख्य अधिकारी यांच्या समोर मांडला व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर यांच्या ढीसाळ नियोजनामुळे यात्रेत दाखल झालेल्या हजारो पशु मालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा पशुधन संवर्धन अधिकारी बोधनकर यांच्यावर कारवाईची करण्याचे निर्देश आमदार शामसुंदर शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माळवदे यांना दिले, माळेगाव यात्रेच्या अगोदरही दोन वेळा आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठका घेऊन माळेगाव यात्रेत भाविक भक्तांना व पशु मालकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे कडक निर्देश आमदार शिंदे यांनी देऊनही जिल्हा परिषदेच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांकडून नाहकपणे माळेगाव यात्रेतील यात्रेकरू व पशु मालकांना नाहक त्रास करावा लागत असल्याचे आमदार शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले.
*आमदार श्यामसुंदर शिंदे व कार्यकर्त्यांनी अश्व मैदानातील दगड उचलून केली मैदानाची साफसफाई*
पशुप्रदर्शनात आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ढिसाळ नियोजनावर आमदार शिंदे यांनी त्रिव संताप व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत यात्रेत आलेल्या लाखो रुपये किमतीच्या अश्वांना या घोडा मैदानात असलेले मोठ-मोठे दगड लागून अश्वांच्या पायांना मोठ्या जखमा झाल्याचे आमदार शिंदे यांच्या निदर्शनास येतात आमदार शिंदे ,आशाताई व इतर कार्यकर्त्यांनी स्वतः या मैदानातील मोठमोठे दगड जवळपास एक तास उचलून हा अश्वांचा थांबण्याचे मैदान साफ केली असल्याने स्वतः या भागातील लोकप्रिय आमदारांना अश्व ,पशु ,पशुंच्या मैदानातील पशुना त्रास होणारे मोठे दगड उचलून अश्व मैदान खुले करावे लागत असेल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी हे आपल्या मूलभूत कर्तव्यात कसूर करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची चर्चा माळेगाव यात्रेत दाखल झालेल्या यात्री करू मध्ये रंगली आहे.
*यात्रेकरूंना मूलभूत सुविधा पुरविण्यात कसूर केल्यास अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही= आमदार शिंदे*
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या खंडोबारायाच्या माळेगाव यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना व छोटे मोठे व्यापारी ,अश्व व इतर पशु मालकांना मूलभूत सोयी सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने काटेकोरपणे पुरवाव्यात, यात्रेत दाखल झालेल्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी जर कमी पडत असतील तर अशा मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
*पशु प्रदर्शनाची आमदार शिंदे यांच्याकडून पाहणी*
माळेगाव यात्रेत काल शुक्रवारी पशु प्रदर्शनात दाखल झालेल्या विविध जातींचे अश्व श्वान कोंबडे व इतर पशु पक्षांची आमदार श्यामसुंदर शिंदे ,आशाताई शिंदे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार व कार्यकर्त्यांनी पाहणी करून या पशु मालकांच्या यात्रेत होणाऱ्या विविध समस्यांची व अडीअडचणीची तळमळीने विचारपूस करून या पशु मालकांच्या व इतर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश आमदार शामसुंदर शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.