अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर, या संस्थेचे श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने’ छत्रपती चौथे शिवाजी महाराज’ यांच्या नावे देण्यात येणारा अतिशय मानाचा ‘छत्रपती चौथे शिवाजी महाराज’राज्य साहित्य विशेष गौरव 2022 हा प्रा. विठ्ठल बरसमवाड लिखित *क्रांतीरत्ने* या चरित्र ग्रंथास सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनी म्हणजेच 25 डिसेंबर २०२२ रोजी राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे प्रदान करण्यात येणार आहे, प्रा. विठ्ठल बरसमवाड हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या *महात्मा गांधी विद्यालय येळी* ता, पाथर्डी येथे कार्यरत असून ते इतिहास विषयांचे अध्यापन करतात.आजतागायत त्यांनी १) हिंदूधर्मातील तीर्थक्षेत्रे,२) क्रांतीपूर्व,३)इतिहासातील हिरे,माणके ४) पंचरत्ने,५)क्रांतीरत्ने,६)विठूमाऊली,७) सारथी सुविचार संग्रह, ८) मराठी ज्ञानपीठाचे मानकरी, इत्यादी ग्रंथाचे लेखन केले आहे, आणि त्यांनी आजतागायत सामाजिक आध्यात्मिक,
′
शैक्षणिक विषयांवर प्रांसागिक शेकडो लेख वर्तमान पत्रातून लिहिले आहेत, दीन, दलित,दिव्यांग विद्यार्थी आणि समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना मदत व पुरस्कार देण्यासाठी स्वतः त्यांनी विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान, खैरकावाडी येथे स्थापन करून अनेक जणांचा त्यांनी यथोचित सत्कार केला आहे, तसेच अनेक शाळा, महाविद्यालयात व्याख्याने दिली आहेत, त्यांना यापूर्वी’ *राजे मल्हारराव होळकर* व युवा ध्येय समूह अहमदनगर यांच्यातर्फे *आदर्श शिक्षक पुरस्कार* मिळाले आहेत,
म्हणूनच संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०२२ चा सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीला पुरस्कार प्रदान केला आहे,त्यामुळे प्रा.विठ्ठल बरसमवाड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.