अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक सयुक्त महामंडळ पुणे मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी 27 ला विविध मागण्याच्या संदर्भात नागपूर विधानसभेवर धडकणार – राज्य सचिव प्राचार्य मोतिराम केंद्रे यांची माहिती
अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक सयुक्त महामंडळ पुणे मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी 27 ला विविध मागण्याच्या संदर्भात नागपूर विधानसभेवर धडकणार – राज्य सचिव प्राचार्य मोतिराम केंद्रे यांची माहिती
कंधारः- ता.प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सयुक्त महामंडळ पुणे संघ नागपूर अधिवेशनात विधानसभेवर 27 डिसेंबर 2022 ला महामोर्चाद्वारे धडक देणार आहे . सदर मोर्चाला शैक्षणिक क्षेत्रातील आमदार व मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे . या महामोर्चा मध्ये सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ राज्य सचिव प्राचार्य मोतिराम केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये दिली . सदर सभेमध्ये संस्थापक अध्यक्ष मा रावसाहेब आवारी ,मारोती खेडेकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र , वसंत पाटील मा.अध्यक्ष महाराष्ट्र , बारवकर मा.सचिव महाराष्ट्र ,हानमंतराव साखरे सहसचिव महाराष्ट्र ,संजय सिप्परकर मराठवाडा अध्यक्ष विभागिय , अशोक मोरे माजी सचिव ( नांदेड शिक्षण मंडळ ) , चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये दिली .
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करणे .१ नोव्हेंबर २००५ ला किंवा त्यानंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. खाजगी माध्यमिक शाळांना वेत्तनेत्तर अनुदान पूर्ववत माध्यमिक शाळा संहितेनुसार देण्यात यावे. कोविड १९ काळातील प्रभावामुळे मृत व आजारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वैद्यकिय परीपूर्ती देयके व इतर देयके तातडीने मंजूर करण्यात यावी .
तसेच कोवीड पश्चात होणारे आजार वैद्यकिय प्रतीपूर्ती देयके तात्काळ मंजूर करण्यात यावी . स्वतंत्र शासन निर्णय निर्मगीत करण्यात यावा. सिव्हील सर्जनने मान्य केलेली देयके व खाजगी डॉक्टर कडून उपचार वैद्यकिय प्रतीपूर्ती देयके मंजूर करावे. केंद्रीय कर्मचारी प्रमाणे सेवानिवृत्त कर्मचा-याच्या वैद्यकिय सुविधाची रक्कम मिळण्यात यावी.शाळाच्या संच मान्यता करीता विद्यार्थ्याची आधार कार्डची सक्ती करण्यात येवू नये.सेवा अधिनियम कायदा अंतर्गत शिक्षण विभागात प्रलंबित असणारे शिक्षकांच्या प्रकरणाबाबत कठोर कार्यवाही व नियोजन होण्याकरीता शिक्षक समन्वय समिती गठीत करण्यात यावी.अंशतः अनुदानीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १२ वर्ष आणि २४ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा .
आदिवासी आश्रम शाळा नो वर्क नो पे अतिरीक्त शिक्षक समायोजनाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा .शालेय शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करण्यात यावी. ५ वर्षापासून प्रलंबित असलेले शिक्षण सेवक मानधन, मेडीकले बिले,जीपीएफ परतावा, अंशत राशीकरण, अर्जीत रजा रोखीकरण व इतर देयके मंजूर करण्यात यावी. आदी मागणीचा यात समावेश आहे
■ नोट
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सयुक्त महामंडळ पुणे संघ द्वारा नागपूर अधिवेशन विधान सभेवरती दिनांक 27 डिसेंबर 2022 मंगळवारला शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांकरिता धरणे आंदोलन व महामोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे . कृपया आपल्या जिल्ह्यातील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे सदर आंदोलन यशवंत स्टेडियम नागपूर ला १२ वाजे पासून राहिल .अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ राज्य सचिव प्राचार्य मोतिराम केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये दिली .सर्वांनी सहभागी व्हावे हि नम्र विनंती .