माझा एक मित्र मला म्हणाला होता ,, सोनल मला देवाने एकही कला दिली नाही ना सौंदर्य दिले.. त्याला म्हटलं ,,अरे उत्तम बिझनेसमन आहेस .. भरपुर पैसे आहेत भरपूर प्रॉपर्टी आहे…जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आहे ते बघ ना..
ज्याला हा सगळा बॅलन्स सांभाळावा लागतो त्याचा कोणी कधी विचार केलाय का ?? .. आपण कधीही करत नाही… इतक्या करोडो लोकांना सगळ्या विभागात समसमान बसवायचं आणि या जगाचा समतोल राखायचा ही गोष्ट आपण घेतो तितकी नक्कीच सोपी नाही..सगळा भार एकटा कसा पेलवत असेल ना ??आपण सतत तक्रारी करतो आभार खुप कमी वेळा मानले जातात.. कृतज्ञता खुप कमी वेळा व्यक्त केली जाते..
आपले कुटुंब सांभाळताना आपली दमछाक होते मग अनेक कुटुंब तो कशी सांभाळत असेल ना ?? .. सबका मालिक एक म्हणतो पण त्यालाही एकदा विचारुयात दमत असशील नारे ?? … आम्ही चित्रविचीत्र वागतो त्याबद्दल शिक्षाही देतोस पण लगेच प्रेमही करतोस.. कधी आमचा पालक तर कधी शिक्षक होतोस पण आम्ही आमचा स्वार्थ पहातो .. देव नसतोच असही म्हणतो पण तु वेळोवेळी प्रचिती देतोस.. महामारी येउन गेली तरीही आम्ही परत पूर्वीसारखे वागतो तरीही तो परत आपल्याला वेगवेगळ्या संधी देतो तो अशी संधी का देतो तर आपण सुधारावेत पण आपण खरच याचा कधी विचार करतो का ?? ..
एकाने मारामारी केली तर दुसऱ्याला लगेच ती सोडवायला पाठवतो पण कधीही क्रेडीट घेत नाही..आजार आला की लगेच डॉक्टर पाठवतो आम्ही म्हणतो देवासारखा धावुन आलास पण त्याला तिथे कोणी पाठवलं असेल याचा विचारच करत नाही.. आतापासुन प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर हा असा विचार नक्की करुयात कारण ज्याला आपण वाईट समजतो ते चांगलं असतं हे आपल्याला कालांतराने पटतं पण तोपर्यंत आपण त्याला नावं ठेउन मोकळे झालेलो असतो..
पाण्याने शमणारी तहान कोल्ड्रिंकने शमत नाही कारण पाणी त्याने तयार केलय आणि कोल्ड्रिंक आपण तयार केलय .. वेगळा आणि चांगला विचार करुन पहा आणि आपल्यात होणारा बदल अनुभवा.. सोच बदलो… देश बदलेगा