ग्रो अँड ग्लो पब्लिक स्कूल कंधार येथिल विद्यार्थिनींचे पुणे विभागीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश.

कंधार ; प्रतिनिधी

ग्रो अँड ग्लो पब्लिक स्कूल कंधार येथिल नवव्या वर्गातील विद्यार्थिनी कु. मो. सलवा अफशीन मो. शफी आणि कु. श्री (डॉली) संजय बनसोडे यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री. संदीप ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले सीबीएसई चे विभागीय विज्ञान प्रदर्शन. नुकत्याच नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागीय ( महाराष्ट्र, गोवा, दिव- दमण आणि सिल्वासा) विज्ञान प्रदर्शनामध्ये मोठ्या गटात (9वी ते 11वी) या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात दिमाखदार प्रवेश मिळवला.

राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन हे जानेवारी 2023 मध्ये दिल्ली NCR येथे होईल. देशातील एकूण 16 विभागातून येणाऱ्या विजेत्यांसोबत या कंधार येथून जाणाऱ्या मुली स्पर्धा करतील, ही ग्रो अँड ग्लो पब्लिक स्कूल साठी तसेच संपूर्ण कंधार वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. या मुलींच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातील यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *