आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते माळेगाव यात्रेतील कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन

लोहा / प्रतिनिधी

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या व माळेगाव यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते काल शनिवारी करण्यात आले .

यावेळी आमदार श्याम सुंदर शिंदे व विक्रांत शिंदे यांनी कुस्ती स्पर्धेसाठी माळेगाव यात्रेत दाखल झालेल्या विविध भागातील कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार शिंदे म्हणाले की कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व नावाजलेला मैदानी खेळ असून माझ्या लोहा कंधार मतदार संघातील नवतरुण कुस्तीपटूंना राष्ट्रीय पातळीवर कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी माझ्या मतदारसंघातील कुस्तीपटू हे सक्षम असल्याचा मला विश्वास असल्याने मतदारसंघातील कुस्तीपटूंना विविध दर्जेदार सेवा सुविधा व कुशल प्रशिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील असून कुस्ती या मैदानी खेळाला अधिक महत्त्व येण्यासाठी मी निधीची कधीही कमतरता भासू देणार नसल्याचे ही यावेळी आमदार शिंदे यांनी सांगितले,

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माळवदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित पाटील शिंदे, गटविकास अधिकारी शैलेश वावळे, उपसभापती श्याम अण्णा पवार, माळाकोळीचे सरपंच मोहन काका शूर, मधुकर बाबर ,माजी सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, नागेश हिलाल, बालाजी ईसादकर, संतोष मुकनर सह कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार संघातील कुस्तीपटूंना दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी सदैव कटिबद्ध= आमदार शिंदे

लोहा कंधार मतदार संघातील कुशल व नवतरुण कुस्तीपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी त्यांना दर्जेदार प्रशिक्षण व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवतरुण कुस्तीगीरांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन व सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्नशील असून लोहा कंधार मतदारसंघांमध्ये पुढच्या वर्षीच्या माळेगाव यात्रेमध्ये व लोहा कंधार शहरामध्ये कुस्ती स्पर्धेसह कबड्डी, खो-खो या मैदानी खेळांचे सामने ठेवण्यासाठी मी कटिबद्ध असून मैदानी खेळांना यापुढे मी अधिक महत्त्व देणारा असून मतदारसंघातील अधिकाधिक नवतरुणान हे मैदानी खेळामुळे मतदार संघातील नव तरुण हे सशक्त व बलवान होण्यासाठी व हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर मतदारसंघाचे नाव लौकिक करतील असा दृढ विश्वास यावेळी आमदार शिंदे यांनी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *