Cleavage आणि सुंदर चेहरा

Cleavage यातुन फक्त स्त्रीची मादकता दिसत नाही तर सौंदर्यही दिसतं.. ते दाखवायचं की नाही हा वैयक्तिक चॉइस.. आणि पहाणाऱ्याने त्यातील सौंदर्य पहावं हे त्याच्यावरील संस्कार..

डीपनेक ब्लाउज ने स्त्रीच्या सौंदर्यात नक्कीच बहार येते जशी कमरेखाली साडी नेसल्याने येते.. पण मी नेहमी म्हणते की विचार आणि स्वभाव उत्तम हवेत जे ते सौंदर्य पहाणाऱ्याकडेही हवेत.

पुरुषांना cleavage चं आकर्षण असणं नैसर्गिक आहे कारण तो अवयव त्यांच्याकडे नाही आणि म्हणुनच आपल्या या अवयवाला आणि त्यातील सौंदर्यला खरा खुरा न्याय मिळतो.. बोल्ड आणि कल्चर असावं व्हलगर नसावं म्हणजेच काय यामधील सीमारेषा पुरूषस्त्री दोघांनीही सांभाळावी.. एका इंग्लिश पुस्तकात वाचलं होतं त्यातील अमृत आपल्याला घडवतं बिघडवत नाही.. बिघडतो आपण आपल्या वाईट विचाराने आणि वाईट नजरेने..

सुंदर चेहरा हा प्रत्येकाला वेगळा दिसतो कारण सौंदर्य मोजता येत नाही कारण ते व्यक्तीपरत्वे बदलतं .. सुंदर चेहऱ्यावरुन तुमचं लक्ष क्लीवेजकडे जातं तेव्हा निसर्गाच्या कलाकृतीचा आदर करावा वाटतो.. त्यावर असणारा तीळ आणि चेहऱ्यावर असणारी खळी यातील सौंदर्य सगळ्याकडे असतं तर कोणीही कोणाकडे ढुंकुन सुध्दा पाहिलं नसतं.. मी कालच्या आर्टीकलमधे लिहिल्यानुसार त्याला यामध्येही बॅलन्स साधायचा आहे.. कोणाला काय द्यावं हे त्याला माहीत आहे पण त्याचसोबत आपण काय पहावं आणि कसं जपावं हे आपल्या हातात आहे.

सोशल मिडीयावर वाईट कमेंट करण्यापेक्षा आपली विचारसरणी बदला किवा स्वतःला घडवा कारण ज्यांच्याकडे सौंदर्य नाही त्यांना काय वाटत असेल याचाही विचार करा..
Cleavage दाखवणे याचं मी समर्थन नक्कीच करणार नाही पण यात वाईट आहे असही म्हणणार नाही.. स्त्रीच्या डोक्यापासून पायापर्यत तिला असं काही बनवलय की पुरुषाचा मेंदु त्यानुसार बनवला असावा की काय असा प्रश्न मला बरेचदा पडतो कारण दोघेही एकमेकांना पुरक आहेत.. दोघांचाही मान ठेवुयात आणि निसर्गाच्या कलाकृतीचे आभारही मानुयात.

सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *