नांदेड ; मुखेड तालुक्यातील (खैरकावाडी) गोकुळवाडी येथील प्रा. विठ्ठल बरसमवाड यांना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्यविशेष गौरव २०२२ हा प्रा. विठ्ठल बरसमवाड लिखित ‘क्रांतीरत्ने’ या चरित्रग्रंथास सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून जाहीर झाला.
हा पुरस्कार सोहळा दि. २५ डिसेंबर रोजी राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
प्रा.विठ्ठल बरसमवाड यांनी आजतागायत त्यांनी हिंदूधर्मातील तीर्थक्षेत्रे, क्रांतीपूर्व, इतिहासातील हिरे, माणके पंचरत्ने, क्रांतीरत्ने, विठूमाऊली, सारथी सुविचार संग्रह, मराठी ज्ञानपीठाचे मानकरी, इत्यादी ग्रंथाचे लेखन केले आहे. आणि त्यांनी आजतागायत सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक विषयांवर प्रासंगिक शेकडो लेख वर्तमान पत्रातून लिहिले आहेत.
त्यांना यापूर्वी राजे मल्हारराव होळकर व युवा ध्येय समूह अहमदनगर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.