शीख धर्माचे नवे गुरू शहीद तेग बहादुर यांचे नातवंडे आणि गुरुगोविंद सिंग यांचे चार पुत्र १) साहबजादे बाबा अजित सिंगजी (वय १५ वर्ष) २) साहबजादे बाबा जुझारसिंगजी (वय १३वर्ष) साहबजादे बाबा जोरावरसिंगजी (वय ९ वर्ष)साहबजादे बाबा फत्तेसिंहजी ( वय ७ वर्ष)ही चार पुत्र म्हणजे वीर बालके पहिले दोन्ही बालके मुघलांशी प्रत्यक्ष कुरूक्षेत्रावर दोन हात करतांना धारातिर्थी पडून जबरन धर्म परिवर्तन या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हौतात्म्य पत्करले.दोन पाच-पाच योध्द्याच्या तुकड्यांचे नेतृत्व करतांना बलिदान दिले.
त्यावेळी गुरुगोविंद सिंग यांच्या समोर गुरु गोविंदसि॔ग यांचे अनुयायी त्या दोन एक साहेबजादे बाबा अजितसिंगजी आणि दुसरे साहेबजादे बाबा जुझारसिंगजी यांच्या कुरुक्षेत्रावर पडलेल्या वीरप्रेतावर उपरणी पांघरण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी वीर बालकांचे पिता संत गुरुगोविंद सिंग महाराजांनी त्यांना म्हटले की, टाकयचे असेलतर वीरगतीस प्राप्त होणारे दहाच्या दहा बालके यांचेवर उपरणे पांघरा अन्यथा फक्त फक्त माझ्याच बालकांवर नको.ही सर्व वीरगतीला प्राप्त झालेले चिमुकल्या बालकांना उपरणे पांघरा अन् उरले तर माझ्या लेकरांवर पांघरा.हा विचार संत गुरु गोविंदसि॔ग यांच्या मानवता धर्माला चार चांद लावणारा आहे.
आनंदपूर साहेब तेथुनच आपली आजी माता गूजरी यांचेसह साहबजादे बाबा जोरावरसिंगजी व सर्वात लहान साहबजादे बाबा फत्तेसिंगजी आपल्या परिवारा पासून बिछडले.त्यावेळी ते मुघलांच्या तावडीत सापडले.त्यांना यवनासूरांनी जिवंत भिंतीत गाढून मारण्याचा बेत आखला.
भिंतीत गाढून मारतांना पहिल्यांदा साहबजादे फत्तेसिंहजी यांच्या शीरा पर्यंत भिंत आली.त्यावेळेस साहबजादे बाबा वीर जोरावरसिंग यांच्या डोळ्यात अश्रू आले.त्यावेळेस चिमुकला आपल्या भावास म्हणतो आहे.
आप रो रहे है। तो वीर साहबजादे जोरावरसिंगजी म्हणाले! पहिले तो मैं इस दुनियामें कदम रखा। लेकिन मैं पहिले मरना चाहिए॥ तुम तो छोटे हो न।लेकिन आप मेरे से खतम हो रहे हो।इसलिए मैं रो रहा हू॥त्यांतर दोघेही भिंतिच्या आतमध्ये गदमरुन गेले.ही दोन्हीही वीर बालके ताकदीचे होते, त्यांनी जोरात हात अन् पाय हालविले.
त्यावेळी त्या ओल्या भिंतीच्या विटा ढासाळल्या तेव्हा दोघेही मूर्च्छित पडले.निर्दयी मघलांनी त्यांच्या नरडीवर सुरीगत तलवार फिरवून आपली क्रुर निर्दयीवृत्ती दाखवून मानवतेस काळीमा फासले.
त्या चिमुकल्या दोन्ही बालकांना हौतात्म्य आले.असा मर्दुमकीचा इतिहास उजेडात आनतांना भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी या वर्षापासून वीर बाल दिवस संपूर्ण देशात साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय खरच अभिनंदनीय आहे.२० डिसेंबर २०२२ ते २७ डिसेंबर २०२२ या सप्ताहात या चिमुकलील्यांच्या बलिदानाचे स्मरण दरवर्षीच आपण सर्वांनी करुन त्यांना विनम्रभावे अभिवादन करणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे.
वीर बाल दिवसाच्या औचित्याने सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार त्यांच्या शौर्याच्या बलिदानास नतमस्तक होऊन मानाची कोटी-कोटी जयक्रांति करुन विनम्र अभिवादन करते!वाहे गुरुजी का खालसा।वाहे गुरुजी की फत्तेह॥ जो बोले सो निहाल।सत् श्री अकाल॥ शीख धर्माच्या देहधारी दहा संत गुरुवर्यांना नतमस्तक! गुरु मान्यो ग्रंथ, गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथराज साष्टांग दंडवत!