माधव गोटमवाड यांना” उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2022-2023″ प्रदान

प्रतिनिधी –

नांदेड जिल्ह्यातील दैनिक चालू वार्ता दैनिकाच्या पत्रकार-प्रतिनिधींच्या वतीने आयोजित ‘वार्षिक स्नेह मेळावा-2022 दिनांक 25 डिसेंबर 2022 वार रविवारी मुखेड येथील जिजाऊ मंदीर पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दै.चालू वार्ताचे संपादक डी एस लोखंडे पाटील यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास, भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन व शाल , पुष्पहार श्रीफळ सदर महापुरुषांच्या आदर्शवत अशा कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला गेला.

दैनिक चालू वार्ता या मराठी दैनिकाच्या उन्नतीसाठी आणि येणाऱ्या काळात ब्रॅण्ड बनविण्यासाठी संपादक डी.एस. लोखंडे सरांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.सुमारे दहा लाख वाचकांकडून वाचले जाणारे आपले वृत्तपत्र आगामी काळात घराघरांत पोहोचले गेले पाहिजे, असाही मौलिक सल्ला दिला. त्याचबरोबर गोर-गरीब, रंजले-गांजले, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधींनी सज्ज राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्न केले पाहिजे. शासन-प्रशासन स्तरावर योग्य ते पुरावे असूनही दाद मिळत नसेल तर अर्ध्या रात्री मला फोन केला तरी त्यासाठी मी प्रथम स्थानी राहून न्याय मिळवून देईन असे अभिवचन ही लोखंडे पाटील यांनी दिले.

दैनिक’चालू वार्ता’ या मराठी दैनिकाचे कंधार तालुका प्रतिनीधी माधव गोटमवाड यांचा वृतपत्राचे मुख्य संपादक मा. डी एस लोखंडे पाटील यांच्या हस्ते दि. 25 डिसेंबर 2022 रोजी ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील दैनिक चालू वार्ता दैनिकाच्या पत्रकार-प्रतिनिधींच्या वतीने आयोजित ‘वार्षिक स्नेह मेळावा-२०२२’ या सोहळ्यासमयी पत्रकार माधव गोटमवाड यांचा सन्मान चिन्हरुपी ट्रॉफी पुरस्कार, शाल, मेडल देऊन गौरव करण्यात आला.

मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक, कवी तथा जिजाऊ मंदीर पब्लिक इंग्लिश स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा जोगदंड यांच्या भव्य शैक्षणिक वास्तूमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जमदाडे यांनी केले तर आभार शिवकुमार बिरादार यांनी मांडले
यावेळी उपस्थित नांदेड उत्तर प्रतिनीधी समर्थ लोखंडे, मराठवाड्याचे उपसंपादक ओंकार लव्हेकर, मुख्य संपर्क प्रतिनिधी भरत पवार, परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे,लातूर जिल्ह्याचे कार्यकारी उपसंपादक प्रा.मारोती पाटील बुद्रुक, नांदेड जिल्हा उपसंपादक गोविंद पवार, नांदेड जिल्हा प्रतिनिधी विश्वास खांडेकर, नांदेड प्रतिनीधी प्रा.यानभूरे जयवंत, पूण्यातील शिंदेवाडी गावचे सरपंच विकास मोरे, कंधार ग्रामीण प्रतिनिधी बाजीराव पाटीलग कळकेकर , अहमदपूर प्रतिनीधी रमेश राठोड यांच्यासह शेकडो पत्रकारांची उपस्थिती लाभली होती.

यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये अनेक पत्रकारांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला.आयोजक – सुरेश जमदाडे व शिवकुमार बिरादार मुखेड प्रतिनीधी .
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित मान्यवर आणि समस्त पत्रकारांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *