आज सासऱ्याशी गप्पा मारत बसले होते .. तेही बालसाहित्यिक आहेत त्यामुळे आमच्या वैचारिक गप्पा नेहमीच होतात.. बोलता बोलता ते म्हणाले , अगं एकावेळी किती विषयांवर काम करतेस . जरा शांत बस आणि विचार कर हे सगळं कुठे जाऊन मिळतं ?? ..
मी कॉफीचा मग हातात घेउन बागेत झुल्यावर बसले आणि म्हटलं भगवतगीता क्लास ,, सेक्सवर कादंबरी लिखाण , न्युट्रीशनीस्टचा कोर्स , ट्रांसवुमनच्या लाइफ जर्नीचे शब्दांकन आणि हाऊसवाईफ असे हे सगळे विषय वेगळे आणि एकाचवेळी यावर काम.. पण जेव्हा मी या सगळ्याचा संदर्भ एकमेकांशी लावायला लागले तेव्हा जाणवलं हे सगळं जाऊन थांबतय एकाचठिकाणी.. एकाच गोष्टीची अनेक रुपे आपल्या अवतीभवती घोंघावत आहेत.. सगळ्याचं सार एकच आहे.. सगळ्या कामातुन मिळणारा आनंद हा सारखाच आहे.
बाबाना म्हटलं , तुम्ही म्हणालात म्हणुन मी विचार केला तेव्हा जाणवलं की अनेक नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात तो म्हणजे भगवंत किवा निसर्ग.आणि मग मला त्याचं बर्डन वाटलं नाही.. सेवेच्या रुपात मी त्याकडे पहायला लागले आणि माझा दृष्टीकोनच बदललला
प्रत्येक पावलावर आपल्याला गुरु लागतो इथे सुध्दा सासरे गुरु झाले आणि माझ्या मनावरचा भार एका झटक्यात त्यांनी दुर केला.. म्हणुन घरात संवाद हवा असतो.. कारण संवादातुन आपण अजुन कणखर बनत जातो.. वेगळ्या नजरेतुन आपण प्रत्येक गोष्टीकडे पहायला लागतो.. घरात उच्च शिक्षीत आणि उच्च विचारी माणसं असली की बाहेर फार नाती शोधावी लागत नाहीत.. नाती नशीबाने मिळाली तरी ती टिकवावी आपल्यालाच लागतात.. माझी मुलगीही आता फिल्म इंड्स्ट्रीमधे काम करते .. आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो तरीही एकमेकांशी जोडलेलो आहोत नात्याने आणि कामानेही.