कंधार शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील महाराणा प्रताप चौक ते बौद्ध द्वार वेस सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ चालु करा असे निवेदन लोहा – कंधार विधानसभेचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, कंधार मधील महत्वाचा मुख्य रस्ता महाराणाप्रताप चौक ते बौद्ध द्वार वेस पावेतोच्या सिमेंट रस्त्यास शासनाकडून मान्यता मिळाली व त्यासाठी लागणाऱ्या 5.00 कोटी रुपयांचा निधीही मंजुर झाल्यामुळे कामाचे टेंडर काढण्यात आली. पण प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. हे काम आपल्या अखत्यारित करावयाचे आहे असे समजते.
सदरित मुख्य रस्ता रहदारीस योग्य राहिलेला नाही. दुर्तफा बाजारपेठ, तहसील, नगरपरिषद व न्यायालय असे महत्वाचे शासकीय ईमारती लागुनच आहेत. करीता कृपया लवकर या रस्त्याचे कामास सुरवात करण्यासाठी नगरपरिषद CEO यांना आदेश द्यावेत.असे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.