कल्पक बुद्धीचा ग्रंथप्रेमी: सोनू दरेगावकर

मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला वेगवेगळे छंद जडलेले असतात. संगीत, नृत्य, वृक्ष संवर्धन, पाणी संवर्धन, स्वछता, अन्नदान, गरजूंना मदत, आरोग्य सेवा, किल्ले संवर्धन अशाप्रकारे छंद अनेकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेले असतात. मात्र याही पलीकडे समाजात साहित्य चळवळ टिकून राहिली पाहिजे, सहित्यातून समाजात प्रबोधन व्हावे, चांगले विचार रुजावे, विशेषतः तरुणांमध्ये साहित्य वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने काम करण्याचाही एका अवलियाला छंद असून आशा कल्पक बुद्धीचा ग्रंथप्रेमी म्हणजे युवा साहित्यिक सोनू दरेगावकर नांदेड

 

 

 

महाविद्यालयीन जीवनापासून सोनू दरेगावकर यांना साहित्याची प्रचंड आवड. कंधार येथे डी.एड.चे शिक्षण घेत असताना सकाळी- सकाळी सार्वजनिक वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी ते जायचे हीच सवय पुढे त्यांना ग्रंथाकडे घेऊन गेली आणि पुढे ग्रंथ हेच त्यांचे मित्र बनत गेले. त्यानंतर कंधार येथुन डी.एड. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते काही वर्षांनी नांदेड येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात रुजू झाले.

 

 

 

येथे रुजू झाल्यानंतर ते काही महिने कार्यालयीन कामात मग्न झाले मात्र त्यांच्यातील साहित्य चळवळ त्यांना झोप लागू देईना, अखेर या धकाधकीच्या व्यस्त जीवनातून त्यांनी पुन्हा निश्चय केला की स्वतः साहित्य वाचन करायचे आणि इतरांनाही साहित्याची आवड लावायची. समाजातही साहित्य चळवळ टिकून राहिली पाहिजे यासाठी त्यांनी एक वेगळी चळवळ चालू केली ती म्हणजे ग्रंथ चळवळ. कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, सत्कार, समारंभ आदी ठिकाणी हार, तुरे, शाल, श्रीफळ भेट देऊन एकमेकांचे स्वागत न करता ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्याचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला.

 

 

 

आणि पुढे प्रत्येकाच्या दुःखात धीर आणि सुखात ते ग्रंथ भेट देऊ लागले. या ग्रंथ भेट चळवळीतुन मागच्या सात-आठ वर्षात त्यांनी हजारो ग्रंथ लोकांना भेट दिले. आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ग्रंथ खरेदीसाठी ठरलेले असतात, किमान तासभर तरी वेळ काढून एकतरी ग्रंथ खरेदी त्यांची असते. लग्न, वाढदिवस, स्नेह संमेलन, सामाजिक कार्यक्रम आशा आमंत्रित ठिकाणी वेळातला वेळ काढून ते ग्रंथ भेट देत साहित्य वाचन चळवळ तेवत ठेवतात, यापलीकडे सुटीच्या दिवशी मग विविध साहित्य क्षेत्रातील व्यक्तीतींच्या भेटीगाठी, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणखी साहित्य वाचन समाजात रुजविण्यासाठी काय करता येईल यांसाठी ते धडपडत असतात.

 

 

ज्या प्रकारे ते समाजात ते प्रत्यक्षात आपले साहित्य वाचनाविषसाठी धडपडत असतात तेवढ्या पोटतिडकीने ते सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त करत असताना. कारण सध्या डिजिटल युग असल्यामुळे जास्तीतजास्त लोक आजरोजी डिजिटल मीडियाचा वापर करताना दिसते, हेच पारखून ते तरूणांना साहित्य वाचनासाठी सोशल मीडियावर प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे ही ग्रंथ चळवळ अधिकच गतिमान बनत आहे. त्यांची साहित्यासाठी असणारी ही धडपडत नवोदित साहित्य प्रेमींसाठी निश्चित एक दिशा देणारी ठरत आहे. आशा या कल्पक बुद्धीच्या साहित्यप्रेमी मित्राकडे पाहून असच सांगावस वाटतंय की एखाद्याला पुत्र आणि मित्र असावा तर सोनू दरेगावकर यांचा सारखा.

 

 

 

 

– लेखक
अविनाश पाईकराव,
नांदेड
मो.८३२९४८३४५८
इ-मेल:[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *