कंधार शहरातील जवळपास दहा वर्षापासून रखडून पडलेल्या महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या कंधार शहरातील मुख्य रस्त्याचे काम लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे मार्गी लागले आहे .या कामासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीस शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे .
शहरात सन 2012 मध्ये राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत कंधार शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा मुख्य रस्ता रुंद करण्यासाठी दोन्ही बाजूने असलेली चाळीस वर्षांपूर्वीची मोठी बाजारपेठ जमीनदोस्त करण्यात आली होती .
या रस्त्याचे काम मात्र नगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या राजकारण्यांना या रस्त्याचे काम करता आले नाही, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे या दोघांच्या राजकारणात या रस्त्याचे काम रखडून पडले होते, मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते व धुळीचे साम्राज्य झाल्याने नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत होता .
विशेष या मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे अशी अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालय आहेत यामुळे या रस्त्यावर दररोजच तालुक्यातील हजारो नागरिकांची याच रस्त्यावरून ये-जा असते.या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे कंधार शहर व परिसरातील नागरिक अक्षरशा वैतागले होते .
लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांच्या निधीस राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून या रकमेत महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चौपदरी रस्त्याचे काम होणार आहे, याशिवाय नाली बांधकाम, फूटपाथ, स्ट्रीट लाईट सह इतर कामे होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.
*शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-आमदार शिंदे*
कंधार शहरासह मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे तातडीने होण्यासाठी मी मंत्रालय स्तरावर प्रयत्नशील असून मतदार संघातील गाव ,शहर ,वाडी तांड्यावरील प्रलंबित असलेली विविध विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून ही कामे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघात सिंचन, आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, स्वच्छता, दळणवळण यासह इतर मूलभूत विकास कामांना मी यापुढेही अधिक महत्त्व देणार असून या कामांसाठी मी या भागाचा आमदार म्हणून निधीची कमतरता भासू देणार नसून अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी सांगितले.