विष्णुपुरी जलाशयातून शिराढोण परिसरात सुरळीत पाच आवर्तन पाणी सोडा :-श्याम पाटील कपाळे

 

शिराढोण  ; विष्णुपुरी जलाशयाच्या माध्यमातून शिराढोन उपसा सिंचन प्रकल्पाच्या योजनेतून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी त्यांच्या हक्काचे पाच आवर्तन पाणी सोडण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या तारखा लवकरात लवकर कळवाव्यात या संदर्भाचे निवेदन

कृषी पदवीधर मराठवाडा कार्याध्यक्ष श्याम पाटील कपाळे यांनी माननीय कार्यकारी अभियंता नांदेड उत्तर पाटबंधारे विभाग दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दिले होते परंतु अद्याप कसल्याही प्रकारचे नियोजन पूर्ण न करता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले नाही रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण होऊन एक महिना ओलांडला आहे अद्याप पिकांना पाणी पोहोचले नाही पाण्याविना पिके सुकून जात आहेत या विषयास अनुसरून गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यासमोर एकदिवशी लक्षणीय उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते या रब्बी हंगामात सुद्धा जर शेतकऱ्यावरती हीच परिस्थिती असेल तर आता मात्र आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता दरवर्षी नियोजन पूर्ण करायला पाहिजे पण असं होताना दिसत नाही

आधीच खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस,मूग यासह इतर पिकांच्या अतोनात नुसकान झालेले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी मध्ये आला आहे विषययाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर नियोजनबद्ध आराखडा तयार करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अन्यथा आठ दिवसाच्या नंतर आम्ही अमर उपोषणाला बसणार असल्याचे कृषी पदवीधर मराठवाडा कार्याध्यक्ष श्याम पाटील कपाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *