२०२२ चा आजचा शेवटचा दिवस … माझ्या वाचकानी चाहत्यांनी माझ्यावर आणि माझ्या लेखणीवर खुप प्रेम केलं आणि मला रोज काहीना काही लिहायला भाग पाडलं.. अनेक गुरु वेगवेगळ्या रूपात मला भेटले आणि अनुभव घेत त्यांना वाचत मी रोजच लिहीती झाले..
नवीन वर्षात ३ पुस्तके मी तुमच्या हातात देणार आहे.. ज्यातुन तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करुन तुमची प्रगती करुन घ्यावी हीच अपेक्षा.. तुमचं प्रेमरुपी आशीर्वाद माझ्यासोबत सतत आहेच.. आपल्या सभोवती सतत निगेटिव्हीटी असताना आपण सकारात्मक राहायला शिकवतात पुस्तके .. भगवतगीता हा महान ग्रंथ याची वेळोवेळी ग्वाही देतो.. आपल्याकडे असलेला मोकळा वेळ समाजातील अनेक घटकाना देउन येणाऱ्या नवीन वर्षाचं प्लॅनींग करुयात.. आज ड्रींक ,नॉनव्हेज ची पार्टी करण्यापेक्षा उद्या सकाळी लवकर उठुन व्यायाम करायचाय हा प्लॅन बनवुयात.. होटेलींग आपण नेहमीच करतो मग आज काहीतरी वेगळं करुयात ..
आपल्या हातुन गेल्या वर्षभरात ज्यांना आपण दुखावलं असेल त्यांची माफी मागुयात.. ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद आला असेल त्यांची कृतज्ञता व्यक्त करुयात.. आणि नवीन वर्षात आनंद द्यायला सज्ज होवुयात. सगळ्याना नवीन वर्षाच्या भरभरुन सदिच्छा.. निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा…