स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने राज्याची न भरून निघणारी हानी. : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक ,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे. भाई केशवरावजी धोंडगे यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा नेतृत्व केले तर संसदेत खासदार म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली होती.

गोरगरीब , शेतकरी , कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारून मोठी शैक्षणिक चळवळ निर्माण केली होती. आयुष्यभर एकाच विचारसरणीशी बांधिल राहिलेल्या भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या जीवनातील तत्व कायम पणे जपली होती. शंभरी पार करणाऱ्या भाई डॉ. धोंडगे शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्वही मोठे हिमतीने आणि सक्षमपणे केले होते.

नांदेड आणि मराठवाड्यातील कामगार चळवळीचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *