महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी अर्थात शैक्षणिक मन्याड खोर्याच्या साम्राज्याचे “कंधारपूरवराधिश्वर”डाॅ.भाई केशवराव धोंडगे!

कंधार

कंधार म्हणटले की आठवते ते राष्ट्रकुट घराणे सातव्या-आठव्या शतकात या घराण्याच्या कारर्किदीने

कंधारपूर नावारुपाला आलेले होते.त्या वेळची शिल्पकला अप्रतिमच होती.त्या शिल्पकारांची अनेक साक्ष देत भंगलेल्या अवस्थेत ही अप्रतिम कलेची साक्ष देत आजही संग्रहित आहेत.मराठवाडाच काय उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्या काळात राष्ट्रकुट नगरीतून पाठवलेल्या अन्नधान्यावर गोदा खोर्यातील ज्ञानाचे लंगर चालायचे!त्याकाळी असलेले सार्वजनिक शेकोट्या, सर्वलोकाश्रय मंडप,अशी अनेक जनतेसाठी सुखसोयी तत्कालिन राजा करत असे.तो राजा स्वतःस “कंधारपूरवराधिश्वर” समजत असत.आजही कंधारपूर ऐतिहासिक मानले जाते. राष्ट्रकुट कालिन भूईकोट किल्ला आजही राष्ट्रकुट घराण्याची साक्ष देत उभा आहे.

 

 

नंतर गोर्या इंग्रजाने 150 राज्य केले.त्या कालखंडात स्वातंत्र्य पुर्व अन् स्वातंत्र्या नंतर आपला कंधार हा भाग निजामाच्या अधिपत्याखाली होता.या कालखंडात जे कांही राष्ट्रकुट कालिन शिल्पकारांची शिल्पकला अप्रतिमच होती त्या शिल्पकलेस तोडून विटंबना करण्याची जणुकांही मोहिमच राबवली होती.त्या वेळी अनेक भारत मातेच्या राष्टभक्तांनी या निजामाच्या अन्यायकारक राजवटीचा विरोध करतांना जवळपास कंधार तालूक्यातील ५९ शुर हूतात्मे धारातिर्थी पडले.त्यात त्यांना हौतात्मे आले.भारत देश हा इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला.पण जम्मु-कश्मीरचे व हैद्राबाद ही दोन संस्थाने भारतात विलीन झाले नव्हते. जम्मू-कश्मीरचे राजा हिंदू तर जनता बहुतांशी मुस्लिम व हैद्राबादचे निजाम राजा मुस्लिम तर जनता बहुसंख्य हिंदू तेंव्हा स्वतंत्र भारताचे पहिले सन्माननीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कार्रवाई करुन दोन्ही संस्थाने भारतात विलीन केले.13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1948 चाललेल्या पोलिस कार्यवाहीने दोन्ही संस्थाने बिनशर्त भारतात विलीन झाली.निजामकालिन परिस्थितीत हीआमचा कंधार मागे नव्हता. त्या लढ्यात बहाद्दरपूरा ता कंधार येथील तरुण अग्रेसर होते.त्यांनी जुल्मी निजामाच्या अन्यायकारक राजवटीचा विरोध करतांना कधी भुमीगत तर कधी खुले आव्हान दिले.

 

 

त्यानंतरच्या काळात हे मन्याड खोरे गाजले.ते डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या राजकिय कारर्कीदीने ज्या काळात भाई केशवराव धोंडगे यांना शिक्षण घेण्यासाठी जो त्रास झाला तो गोर-गरीब, सुग्या-मुग्यांच्या यांच्या लेकरांना होवू नये म्हणुन ज्ञानमाता मातोश्री मुक्ताई धोंडगे या माऊलींनी आपल्या बाळ (भुर्या) केशवाला या मन्याड खोर्यात ज्ञानाचे लंगर काढण्याची प्रेरणा दिली.20 जानेवारी 1959 साली कंधार शहरातील छोटी दर्गा येथील तीन शिवलिंग पिंडी अन् मोठी दर्गातील चार शिवलिंग पिंडी स्वतः हाती खुस्सा घेवून काढल्या अन् शासनाच्या स्वाधीन केल्या.त्याच वर्षी श्री व्दादशभुजा देवी राजेश्वर मंदिरा शेजारी सापडली.याच वर्षी यात्रा महोत्सव भरविण्यास प्रारंभ झाला. कंधारच्या ऐतिहासिक शिवाजी चौकात छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा गनीमी काव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.1959 हे वर्ष त्यांच्या जीवनाला ठळक अधोरेखित करते.

 

 

 

त्या काळात म्हणजे 1948 साली संस्था स्थापण केली.आणि ती ही महाराष्ट्राची आन,बान,शान असलेले राजा शिवछत्रपती यांच्या नावाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे ही संस्था पार्वती खोर्यातील गऊळ ता.कंधार या आपल्या आजुळात स्थापन करून आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. पहिली मातृशाळा कंधार येथील गवंडीपार या भागातील दिवंगत जयरामजी वरटी यांच्या वाड्यात सुरू केली. ज्या-ज्या गावात शाळा काढतांना पहिल्या प्रथम वाड्यातच सुरु झाल्या. तेथील वर्ग खोल्यांची जमीन शेणांनी सारवून स्वच्छ करण्यासाठी तेथील सेवकांना मेहनत करावी लागली.त्याकाळी वाहनांची सोय नव्हती पायी जावून तेथील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून शाळा काढणे किती जरुरी आहे. शिक्षणामुळे माणुस हुशार होतोच पण त्यामुळे त्याचा विकास होतो.हे संस्कार केंद्र काढतांना अनेकांचे तन,मन,धनाचे सहकार्य लाभले. ज्यांना जे सहाय्य करावे वाटले त्यांनी अगदी स्वयं प्रेरणेने करुन या मन्याड खोर्यात आजचे चित्र स्पष्ट दिसत आहे. कंधार शहरातील हातईपुरा भागात ती शाळा भरण्यास आरंभ झाला. त्या वेळी ज्ञानदानाचे कार्य भाई गुरुनाथराव कुरुडे, भाई बापुराव वाडीकर, भाई शिवाजीराव बोधगीरे, भाई राजेश्वरराव आंबटवाड, भाई बाबासाहेब लुंगारे अशा अनेक गुरुजनांनी ज्ञानदानाचे कार्य सुरु केले.या आधी भाई केशवराव धोंडगे यांना शिक्षण घेण्यासाठी जो त्रास झाला. ते शब्दात मांडतांना अंगावर शहारे येतात. मातोश्री मुक्ताई यांना वाटत म्हंवा बापू वकील व्हावा.पण नियतीच्या मनात वेगळेच होते. ज्या काळात त्यांच्या इच्छा म्हह्या बापुला “आहेत का?वकील साहेब” ही हाक मातोश्रींच्या कानाला ऐकण्याची उत्कंठता होती.

त्यांना भाऊबंदकीमुळे पाटलाचा वाडा सोडण्याची वेळ आली. मातोश्री मुक्ताईने आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन ह.भ.प.दिवंगत माणिकराव कुरुडे यांच्या घरी आश्रयास आली.जवळपास 20 वर्षाचा कालावधी पर्यंत येथेच वास्तव्य होते.पहिली निवडणूक येथूनच लढवली.लग्न याच घरी असतांना केरवाडी येथील किशनराव पा.जाधव व सौ.वच्छलाबाई किशनराव पा.जाधव या दाम्पत्याच्या उदरी जन्मलेली कन्या चंद्रप्रभावती यांच्या सोबत 15 ऑगस्ट 1963 रोजी केरवाडी (भोपाळ गड)तेंव्हाचा ता.गंगाखेड झाला. नवरदेव आमदार आहे असे केरवाडीच्या पंचक्रोशीत उत्सुकता पसरली होती. त्यांना पाहण्यासाठी खुप गर्दी जमली होती.कंधारहून बैलगाडीने वर्हाडी मंडळी आली होती. वरुन रिमझिम पाऊस सुरु होता.नवरदेव केशवराव यांनी आपले भाषण जोश पुर्ण केले.भाषण संपताच अक्षता वरांच्या दिशेने फेकल्या अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. नवरी मुलगी घरातच असा अनोखा विवाह “न भुतो न भविष्यतिच”पार पडले. पहिली मुलगी (प्रा.चित्राताई लुंगारे)तेथे वास्तव्यास असतांनाच!

ज्या वेळी प्रा.चित्राताई ह्या सहा महिन्याच्या किंवा वर्षाच्या होत्या तेंव्हा केरवाडीतील जाधव पाटलांच्या गढीवर कुख्यात डाकू मारावयास रुक्माजीराव घोबाळे यांनी तर भाई धोंडगे यांच्यावर बंदुकीचा नेमच धरला होता. तितक्यात ती चिमुकली (प्रा. चित्राताई) रडत होती.चिमुकलीचा रडं थांबवण्यात तीला समजवण्या भाई केशवरावजी धोंडगे मोकळ्या जागेत आले.घोबाळे यांनी नेम धरलाच होता पण……….त्या चिमुकलीच्या रडण्याने कुख्यात रुक्माजीराव घोबाळे यांच्यातील माणुस जागा झाला.तेंव्हा त्यांनी नेम घरलेली बंदुक माघारी घेतली.होणार पुढील अनर्थ टळला.

 

 

 

प्रा.चित्राताई पहिले कन्यारत्न जन्मले,

रुक्माजी घोबाळे ठार करण्यास आले!

चिमुकलीचा रड ऐकुनी ह्रदय हेलावले,

बंदुक चालवायचे त्यांनी थांबवले!

आज तो मुक्ताईसुत,संस्थापक व संचालक, विद्रोही विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक, आदर्श राजकारणी,मन्याड खोर्यातीलच काय महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी अर्थात शैक्षणिक साम्राज्यांचे “कंधारपूरवराधिश्वर”, रेकाॅर्डब्रेक सत्याग्रहाचे निर्माते,जागतिक गुराखी साहित्य संमेलन व नाट्य संमेलनाचे संयोजक, फर्डे वक्ते, आभ्यासू खासदार व आमदार, निर्भिड व्यक्तीमत्व, एका आदर्श संपादक, जयक्रांति घोष वाक्याचे निर्माते,एक मातृभक्त, इतिहास जतन करून निर्मिती करणारे अवलिया आपण गमावलो असतो.पण कृपा मातोश्री मुक्ताई धोंडगे व योगिराज निवृत्ती महाराज यांची म्हणून

 

 

 

ते आज शतक महोत्सवी जीवन जगत आहेत.सन 1973 सालची घटना नंदीच्या ओट्याला चिर्यांनी बांधले होते चुना निघुन गेल्याने मोठ्या सांदी पडल्या होत्या.राजकीय, शैक्षणिक चर्चा रंगल्या भाई साहेब यांची बोटे सांदीत गेले त्यावेळी मन्यार जातीच्या सापाने चावा घेतला. मला साप चावला असे ओरडले. हे पाहताच आम्हा सर्वांची पाचावर धरण बसली. कंधारच्या सरकारी दवाखान्यात बैलगाडीने आणले तेथे इंजेक्शन नसल्याने लोह्याच्या सरकारी दवाखान्यात इंजेक्शन आहे.तेंव्हा कुरुडे साहेब पं.स.चे सभापती होते.जीपने लोहा गाठले तेथे डाॅ. रणदिवे सर,डाॅ. लतिफ सर इंजेक्शन देवून केशवरावांना वाचविले.त्याच दिवसात सौ.चंद्रप्रभावतीबाईं धोंडगे यांनी जयक्रांति कन्यारत्नास जन्म दिला.

मंदिराच्या ओट्यावर मन्यारने घेतला चावा,

डाॅ. रणदिवे साहेबांच्या दवाखान्यात घेतला धावा!

मन्यार सापाच्या विषाचा पावर उतरावा,

म्हणून योगिराज, मुक्ताईचा केला धावा!

 

 

 

सन 1958 साली सोनखेड येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून दिवंगत डाॅ. शंकरराव चव्हाण तर उदघाटक माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतरावजी चव्हाण यांच्या साक्षीने “आधी लग्न श्री शिवाजी काॅलेजचे अन् नंतर लग्न माझे “अशी भीष्मप्रतिज्ञा करुन ती पुर्ण करणारे महाराष्ट्रातील एकमेव!त्यांच्या संस्थेतील शाखा छ.शिवाजी महाराजांचे नावे दिली आहेत. फक्त एकच शाखा लोहा येथे संत गाडगे महाराज यांचे नावे प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर, महाविद्यालय आहे.त्याचे कारण ही तसेच आहे. काकांडी ता.नांदेड येथे संत गाडगे आले असता. डाॅ. भाई केशवराव धोंडगे हे आपल्या मातोश्री मुक्ताई सोबत किर्तनास गेले.त्यावेळी महाराजांनी उदगार काढले”पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा लागे त्रिलोकी झेंडा”महाराजांनी कंधारला येण्याचे कबुल केले.पण नियतीच्या काळाने कांहीं दिवसातच झडप घातली अन् महाराजांची कंधारला येण्या आधी इहलोकी यात्रा संपली. म्हणून लोहा येथे महाराजांच्या नावे शाखा काढली.श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी कंधारच्या शाखा औरंगाबाद, नांदेड,सोनखेड, हाळदा,बारुळ, दिग्रस, कुरुळा, कंधार, मुखेड येथे उर्दू, कंधारला मगदूमियाॅ, उर्दू हायस्कूल, उर्दू ज्युनिअर, श्री शिवाजी काॅलेज कंधार,मन्याड खोर्यात एखादा काढला असता तर कामगारच मिळाले असते.पण शाळा काढल्यामुळे जवळपास सर्व युवापिढी शिक्षण घेवून महाराष्ट्राची सर्व कार्यालयात तरुण चमकत आहेत.एक हाॅस्टेल म्हणजे म.फुले दलित विद्यार्थी वसतिगृह सुरु करतांना अनेक सहकारी बंधुंनी जसे जमेल तशी मदत केली.

 

 

 

मुक्ताई मातेचे अधुरे स्वप्न म्हणजे त्यांचा बाळ केशव वकील व्हावे. डाॅ.केशवराव धोंडगे हे वकील झाले नाहीत पण….. श्री शिवाजी लाॅ काॅलेज तालुक्याला काढणारे ते एकमेव आहे.आपली वकीलीची कमतरता इतर विद्यार्थ्यांना वकील बनता यावे यासाठी निर्माण केले.पोतराज, देवकरीन, सुग्या-मुग्या, कोळी-वैदू, नाथ गोसावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वकीलीचे शिक्षण घेता यावे. म्हणून लाॅ काॅलेज कंधारला निर्माण केले.1985 साली जिभजोड साहित्यिकांसाठी जागतिक गुराखी साहित्य संमेलनने भरवण्यासाठी गुराखी गडाची निर्मिती केली.आज ही ते क्रांतीभुवन बहाद्दरपूरा ता कंधार येथील मातंग व बोध्द समाजांच्या वस्त्यांत जावून बालक व तरुणांना शाळेत जाण्यासाठी आग्रही असतात. त्यांना लहान-लहान लेकरात रमणे हा छंदच आहे.

आज वयाच्या शंभरीत ही श्री शिवाजी हायस्कूल भाग शाळा बहाद्दरपूरा येथे वर्गात विद्यार्थ्यांना अनेक वेळा मार्गदर्शन केले आहे.

 

 

 

25 जुन 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लावली.तेव्हा डाॅ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या सहकार्यने आणीबाणी लढा यशस्वी झाला. 13 स्थानबध्दांनी 13 महिने मिसा अंतर्गत जेल भोगली.आज त्या लढ्यात ज्यांनी-ज्यांनी विरोध केला त्यांना सन्मान पत्र ,दहा हजार रुपये पेंन्शन अन् थकित पेंन्शन दिड लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले.पण त्यांनी अंदोलन प्रमाणात नाकारले.

 

 

 

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता कंधार हे राजकारणाचे केंद्र अन् शिक्षणाचे माहेर घरच म्हणावे लागेल. राष्ट्कुट काळात कंधारपुर येथुन नंदीग्राम नगरीतील गोदातटी तेल, तुप, रवा अशी शिदाच्या स्वरुपात जात असे तेंव्हा भाई केशवराव धोंडगे यांना वाटले आमच्या येथील शिदा अन् शिक्षण दुसरी कडे.म्हणून त्यांनी ज्ञानाचे लंगर सुरु करण्यास कारणीभूत आहे. त्यांना

झालेला शिक्षण घेतांनाचा त्रास आणि मातोश्री मुक्ताई मातेची प्रेरणा ही कारणे आहेत. त्यांचे वाचन,लेखन, चिंतन,मनन,सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे,या मुळेच ते आयुष्यात दीर्घायूषि जीवन जगतात.त्यांनी राजकारणा पेक्षा समाजकारण त्यांच्या आयुष्यात अविभाज्य आहे.

 

 

 

अनेकदा त्यांच्या गावात दलित व मागासवर्गीय भक्त मारोतीच्या पारावर दर्शनासाठी जात नसत.ते पायरीवरच डोक टेकवून दर्शन घेत.तेंव्हा डाॅ. केशवराव धोंडगे यांच्या निदर्शनास ही बाब आल्या नंतर तुम्ही पारावर जावून दर्शन घेता का?मी या पाराला धडक घेवू असे म्हणून त्यांनी मानवता धर्म टिकविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.ते स्वतः मातृभक्त आहेत.विचाराने पुरोगामी विचारांचे असल्याने सोने व पैसा या कडे लक्ष न देता समाजकार्यसाठी चंदनसम झिजले आहेत.डाॅ. भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे ही जोडगोळी आपल्या मैत्रीने आणि विचाराने महाराष्ट्रात नावारुपाला आले आहेत. त्यांना पाच मुली आणि दोन मुले ही आपत्येआहेत.प्रा.चित्राताई,भागिरथा जयक्रांति,मनकर्णिका,भाग्यश्री या पाच मुलींआणि मुक्तेश्वर, पुरुषोत्तम ही मुले.

मातोश्री मुक्ताई ही दम्याच्या आजाराने जर्रजर होती. इकडे श्री शिवाजी काॅलेज कंधारची मान्यता शासनाने काढून घेतली होती.तेंव्हा मातोश्री बाळ केशवाला म्हणाल्या बापु मी पिकलं पान, कधी गळून पडेल याचा नेम नाही? पण गरीबांची ज्ञानाई जगली पाहिजे. तु आता गुरुण्या बरोबर मंबईला जाय अन् श्री शिवाजी काॅलेजची गेलेली मान्यता परत आण!इकडे काॅलेजची मान्यता मिळाली पण माय-लेकरांची शेवटची भेट झाली नाही. ही खंत आज ही त्यांना राहून राहून येते.मातोश्री मुक्ताई यांचे देहावसन 26 जुलै 1964 रोजी आकाडी करीच्या दिवशी बहाद्दरपुरा ता.कंधार येथे सायंकाळी 6:30 वाजता झाले.

गोर-गरीबांच्या लेकराला,

ज्ञान घेण्याचा अधिकार दिला!

त्यांनी ज्ञानदानाचा लंगर चालवला!

 

 

कंधार तालुका सुशिक्षित झाला!

मला वाटते आगळे-वेगळे सत्याग्रह अन् तेही प्रत्येक सत्याग्रहाचे नाव अनोखे असे काढणारे ते देशातील एकमेव सत्याग्रही असतील असे मला वाटते.नामांतराच्या काळात त्यांची भुमिका फार महत्वाची होती.मन्याड खोर्यात दलित बांधवांना अभय देण्याचे या बहाद्दरने केले.त्या काळात सवर्ण समाजातील लोकांनी तर……त्यांना जय भीम म्हणटले पण त्यांची त्यांनी तमा बाळगली नाही.लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांची भुमिका त्यांनी पार पाडली. काल १ जानेवारी २०२३ रोजी प्राणज्योत मालवली.

गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *